Solapur Fire News  saam tv
महाराष्ट्र

Breaking News : सोलापुरात अग्नीतांडव; यंत्रमाग कारखान्याला लागली भीषण आग

सोलापूरमध्ये यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली आहे.

विश्वभुषण लिमये

Solapur Fire News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. सोलापूरमध्ये यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली आहे. चादर आणि टॉवेल निर्मिती करणाऱ्या भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानाकडून आग (Fire) विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या चादर आणि टॉवेल निर्मिती करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील (Solapur) निलम नगर भागातील यंत्रमाग कारखान्याला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. कारखान्यातील सर्व मशीन आणि कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती केली आहे.

कारखान्यातील कामगार वेळीच बाहेर पडल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. आतापर्यंत अग्निशमन दलाचे ७ ते ८ अग्नीबंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उद्या सकाळपर्यंत आग आटोक्यात येण्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे. या दुर्घटनेत कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकरा वर्षाच्या मुलाचा विचित्र प्रकार, शाळेत पुस्तकांसोबत आणलं कंडोम, मुख्याध्यपकांचा चढला पारा

Director Arrested: प्रसिद्ध दिग्दर्शकाला जेल; ३० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक, नेमक प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भेटीसाठी जावई आणि कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल

Paithani Saree Designs: ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची? हे आहेत 5 लोकप्रिय पैठणी साडी प्रकार

Bodybuilder: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT