Solapur News
Solapur News  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur : तिरुपतीला देवदर्शनासाठी गेले, वाटेतच मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात ४ भाविकांचा मृत्यू

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूरातून अपघाताची मोठं वृत्त हाती आलं आहे. सोलापुरातून तिरुपतीला देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वानाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील (Solapur) भाविक तिरुपतीला देवदर्शनासाठी निघाले होते.यावेळी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतत असताना रस्ता दुभाजकाला धडकून अपघात झाला.

तिरुपती जिल्ह्यातील नायडू पेठ ते उथलपट्टू रोडवरील चंद्रगिरीमंडळमध्ये अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातातील मृत आणि सर्व गंभीर जखमी सोलापूर परिसरातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातातील जखमींना तिरुपती रुइया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चंद्रगिरी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

गुजरातमध्ये बाईक-कारची जोरदार धडक; पत्नी थोडक्यात बचावली, 

दिल्लीच्या कांझावालासारखीच एक घटना गुजरात येथील सुरतमध्ये घडली आहे. येथे बाईक आणि कारची जोरदार धडक झाली. यानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. सागर पाटील असे या तरुणीचे नाव आहे.

हे हिट अँड रनचे प्रकरण 18 जानेवारीच्या रात्रीचे आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, सागर पाटील हा आपल्या पत्नीसह सुरत येथील कडोदरा-बार्डोली रस्त्यावर दुचाकीवरून जात होता. तेव्हा एका कारने त्यांना जोरदार धडक दिली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Shiv Sena News | ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात जबरदस्तीने प्रवेश?

Pune Crime: बायकोशी वाद.. चिडलेल्या जावयाने सासुच्या दुचाकीसह १५ गाड्या पेटवल्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

SCROLL FOR NEXT