Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: धक्‍कादायक..प्रेमविवाहानंतर मुलीचा जन्‍म; पैशांसाठी बापाने मुलीला विकले, कला केंद्रात चौघांकडून अत्याचार

धक्‍कादायक..प्रेमविवाहानंतर मुलीचा जन्‍म; पैशांसाठी बापाने मुलीला विकले, कला केंद्रात चौघांकडून अत्याचार

विश्वभूषण लिमये

सोलापूर : प्रेमविवाहातून जन्मलेल्या अल्पवयीन मुलीला पैशांसाठी बापाने कला केंद्रात पाठविले. यानंतर तिच्यावर (Solapur News) केंद्रात आलेल्या चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात पिता, कला केंद्राच्या पाच चालक आणि ४ ग्राहकांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा (Crime News) दाखल झाला आहे. (Tajya Batmya)

पीडितेच्या आईने आरोपी पतीसोबत २००५ मध्ये प्रेमविवाह केला होता. यानंतर त्यांना मुलगी झाली. त्यांच्या दोघांत पटेनासे झाल्यामुळे ते दोघे मागील अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यानंतर पीडिता ही पित्यासोबत राहत होती. दरम्यान, पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीला बापाने चक्क विविध जिल्ह्यांतील कला केंद्रात पाठविल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली होती. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पित्याने पीडितेला पैशांसाठी पुणे, सोलापूर, बारामती या कला केंद्रांत सोपविले. या बदल्यात कला केंद्र चालकांकडून त्यांनी पैसे घेतले.

पैशांसाठी पीडितेला ग्राहकांसमोर त्यांच्यासोबत नाचावे लागत होते. शिवाय यावेळी पीडितेला चार ग्राहकांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पित्यावर तसेच छाया नेर्लेकर (रा. सोलापूर), धोंडराईकर, अनिता वाघोलीकर, मीना पारगावकर (रा. अहमदनगर) आणि पीडितेवर अत्याचार करणारे अनोळखी अशा चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी पित्याला (Police) पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur: शासकीय इमारतीत रंगली दारू पार्टी, जिल्हा परिषद अभियंत्यांचा प्रताप; पाहा VIDEO

Vomiting In Bus: बसमधून प्रवास करताना उलट्या का होतात?

Horrific Accident : विमानतळ रोडजवळ भीषण अपघात, भरधाव ट्रकने डझनभर लोकांना चिरडलं, दोघांचा मृत्यू

Mumbai Monorail: मुंबईच्या मोनोरेलचा पुन्हा खुळखुळा; पावसात सेवा ठप्प, प्रवाशांचा जीव धोक्यात

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT