सोलापूर: अपंग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या गतीमंद आणि दिव्यांग मुलीचा उपोषणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये (Solapur) घडला आहे. वैष्णवी रामचंद्र कुरुळे असं या उपोषणकर्त्या गतीमंद मुलीचे नाव असून ती १२ वर्षांची होती.
ग्रामपंचायतीच्या निधीपैकी ५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्ची घालण्याची तरतूद आहे. मात्र चिकर्डे ग्रामपंचायतीने अनेक वर्षापासून हा निधी खर्ची घातला नाही त्याविरोधात हे उपोषण सुरु होते.
१८ ऑगस्टपासून निधी मिळावा म्हणून चिकर्डे गावातच उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाला गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते. मात्र, दिवसभर उन्हात बसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी दावा केला आहे. दरम्यान ३ महिन्यापूर्वी चिकर्डे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अपंग मुलांना बसवून आंदोलन केलं होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करतो असं आश्वासन दिले होते. मात्र दोषींवर कारवाई झाली नसल्याने आम्ही उपोषणाला बसल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं होतं. तर मृत मुलगी उपोषणाला बसलीच नसल्याचा दावा आता सोलापूर प्रशासनाने केला आहे. या संदर्भात पोलिसांमध्ये (Police) अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही. किंबहुना नातेवाईकांनी पोलिसात कोणतीही तक्रार दिली नसल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.