Akkalkot taluka farmer couple dies Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : महावितरणचा हलगर्जीपणाने गेला शेतकरी दाम्पत्याचा जीव; पती-पत्नीच्या निधनाने अख्खं गाव हळहळलं

Akkalkot taluka farmer couple dies : विजेचा शॉक लागून एका शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या दहिटणेत गावात घडली.

विश्वभूषण लिमये

विजेचा शॉक लागून एका शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या दहिटणेत गावात घडली. अंबादास साळुंखे आणि कलावती साळुंखे असे मृत शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत. दोघेही शनिवारी दुपारच्या सुमारास शेतातील बाजरीवरील पाखरे हुसकवण्यासाठी गेली होती.

मात्र, नियतीने साळुंखे दाम्पत्यासोबत घात केला. पाखरे हुसकवताना महावितरणच्या तुटून पडलेल्या तारांना अंबादास साळुंखे यांचा अंगाचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार शॉक (Electric Shock) बसला. पतीला वाचवण्यासाठी पत्नी कलावती यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

मात्र, त्यांच्याही विजेच्या तारांना स्पर्श झाला. जवळ कुणीही नसल्याने दोघांचाही विजेच्या जोरदार धक्क्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान, साळुंखे दाम्पत्याच्या मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा ठपका साळुंखे दाम्पत्याच्या नातेवाईकांनी ठेवला. त्यांनी दोघांचेही मृतदेह अक्कलकोट पोलीस ठाण्यात आणून ठेवले. याप्रकरणातील दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

अक्कलकोट पोलिसांनी त्यांची समजूत काढत महावितरण कंपनीविरोधात गुन्हा आणि मृत कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदतीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर साळुंखे दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पती-पत्नीचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने अख्ख्या गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT