Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : गोठ्याची भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू; मुसळधार पावसाने पडझड

Solapur Mohol News : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या साधारण वीस- पंचवीस दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. मान्सूनचे आगमन देखील लवकर होत असून त्यापूर्वी अवकाळी पावसाने हाहाकार माजविण्यास सुरवात केली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मागील चार- पाच दिवसांपासून अवकाळीचा जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची देखील पडझड झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. अशातच अतिपावसामुळे मातीची भिजलेली गायींच्या गोठ्याची भिंत कोसळली. या खाली दबून एका मृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली आहे. 

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या साधारण वीस- पंचवीस दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. मान्सूनचे आगमन देखील लवकर होत असून त्यापूर्वी अवकाळी पावसाने हाहाकार माजविण्यास सुरवात केली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात चार- पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने नदी- नाल्यांना देखील पूर आला आहे. तसेच वादळी वाऱ्याच्या तडाख्यात मोठे नुकसान झाले आहे. यातच मोहोळ तालुक्यातील शिरपूर येथे अंगावर गोठ्याची भिंत पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

शेतात काम करण्यासाठी गेली असताना घडली घटना 

गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील गायकवाड यांचा गायांचा गोठा ढासळला. यात शिरापूर येथे अंगावर गोठा कोसळल्यामुळे 80 वर्षे वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तानुबाई मारुती गायकवाड असे मृत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तानुबाई गायकवाड ह्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी सदरची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. 

भावाचा मुलगा गेल्याने घटना उघड 

दरम्यान बराच वेळी होऊन देखील तानूबाई या घरी आल्या नव्हत्या. यामुळे त्यांच्या भावाचा मुलगा दिग्विजय ताकमोगे हे शेतात गेल्यानंतर गोठा कोसळल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर पडलेल्या गोठ्याखाली तानुबाई गायकवाड दिसून आल्या. त्यांनी तानूबाई यांना बाहेर काढत मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT