Solapur Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Solapur Bajar Samiti : चक्क भाजपने केली काँग्रेससोबत युती, सोलापुरात घडला चमत्कार, वाचा

Solapur News : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या श्री. सिद्धेश्वर विकास पॅनलने निवडणुकीत १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजप आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका बसला

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकताच पार पडली आहे. यात सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने विजय मिळविला असून बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापती पदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया नुकताच पार पडली आहे. या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. अर्थात आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्याशी केलेली हातमिळवणी फायद्याची ठरली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या श्री. सिद्धेश्वर विकास पॅनलने निवडणुकीत १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजप आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका बसला. 

एकहाती वर्चस्व 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये थेट लढाई झाली होती. या लढतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचा एकतर्फी विजय झाला होता. यात निर्णायक असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील ११ पैकी ११ जागांवर कल्याणशेट्टी पॅनलचे एकहाती वर्चस्व मिळालं होतं. त्यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड होणार? याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती.

काँग्रेस नेत्याकडे सभापतिपद 

दरम्यान श्री. सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचा विजय मिळविल्यानंतर आज सभापती व उपसभापती पद निवडीसाठीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सभापती आणि उपसभापती दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने दोन्ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांची सभापती पदी आणि भाजप नेते सुनील कळके यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT