सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान सोलापुरात मतदानाच्या दिवशी विजापूर वेस परिसरात काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले होते. यावरून फटाके फोडणाऱ्या सात जणांविरूद्ध जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) उत्साह आता शिगेला पोहचला आहे. २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता उद्या मतमोजणी होणार आहे. यामुळे निकालाची उत्कंठा लागून आहे. मात्र मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी वाद झाल्याचे पाहण्यास मिळाले. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. मात्र (Solapur News) सोलापुरात तर चक्क कार्यकर्त्यांनी फटाके फोडले होते. याची दखल पोलिसांनी घेतली आहे.
दरम्यान पोलिस नाईक धनाजी बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैफ अरिफ अलमेलकर, हुसेन मुश्ताकअहंमद मैदगी आणि त्यांच्या सोबतच्या इतर ४ ते ५ जणांवर जेल रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता भंग तसेच मतदान प्रक्रिया सुरू असताना बेगमपेठ ते विजापूर वेस दरम्यान शॉपर स्वेअर अपार्टमेंटजवळील ५ ते ६ जणांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून फटाके फोडले. त्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.