Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : दक्षिण सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; शिंदे कुटुंबीयांचा अपक्ष उमेदवाराला पाठींबा

Solapur News : विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी यांच्या काट्याची टक्कर पाहण्यास मिळत आहे. मात्र काही ठिकाणी बंडखोरी झाल्याने अडचणी वाढल्या आहेत

विश्वभुषण लिमये

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत मतदान होत असताना दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काळात यांना पाठिंबा दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) यांच्या काट्याची टक्कर पाहण्यास मिळत आहे. मात्र काही ठिकाणी बंडखोरी झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप सार्‍या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहेत. ज्या पद्धतीने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्याच पद्धतीने सोलापूर (Solapur) दक्षिणमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ही लढत होईल; असे चित्र असताना काँग्रेसच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला आहे. 

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला तिकीट 

सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. असे असताना देखील शिवसेनेकडून चुकून त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्ही माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली असताना सुद्धा एबी फॉर्म न देता माघार घेण्यात आली होती; असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. 

अमर पाटील यांची अडचण 

महाविकास आघाडीकडून अमर पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काळात यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने अपक्ष उमेदवार धर्मराज कडादि हे विजय होईल; असा विश्वास प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापुरात मालोजीराजे , मधुरिमाराजे छत्रपती यांनी बजावला मतदानाचा हक्क

Parli Rada : ऐन थंडीमध्ये परळीत भडका, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला, शरद पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Ajit Pawar News : शर्मिला पवारांचे आरोप धांतात खोटे, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण | Marathi News

Akola News : अकोल्यात अवैध दारूसाठा जप्त; ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दोघेही उमेदवार समोरासमोर आले, सरवणकरांच्या जॅकेटवरचा धनुष्यबाण अमित ठाकरेंनी सुलटा केला, VIDEO

SCROLL FOR NEXT