Solapur BJP News Saam tv
महाराष्ट्र

Solapur BJP News: अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मार; सोलापूरात भाजपचे आंदोलन

अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मार; सोलापूरात भाजपचे आंदोलन

विश्वभूषण लिमये

सोलापूर : छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हे, स्वराज्य रक्षक होते; असे वक्तव्य केल्याप्रकरणी आज (Solapur) सोलापुरात अजित पवार यांच्या विरोधात शहर भाजपच्यावतीने पूर्व भागातील पद्मशाली चौकात अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मार आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. (Tajya Batmya)

धर्मवीर संभाजीराजांच्या विषयांमध्ये अवमान कारक उद्‌गार आणि उल्लेख केल्या प्रकरणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्‍या विरोधात राज्‍यभरात आंदोलन सुरू आहे. त्‍यानुसार भारतीय जनता पार्टी (BJP) सोलापूर शहरच्या वतीने निषेध करण्यात आला.

लोकांच्या मनामध्ये घर केलेल्या राष्ट्रपुरुषांना त्यांना मिळालेली जी बिरूदावली असते, त्याचे सर्टिफिकेशन करण्याचे कुठलेही अधिकार अजित पवार यांच्‍याकडे नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये देवा इतकीच प्रत्येकाच्या मनामध्ये जी व्यक्ती आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांच्या विषयाचे उद्‌गार काढलेले आहेत, ते खरोखर निषेधार्य आहेत. असे म्हणत भाजपच्यावतीने अजित पवार यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : संसदेतील सर्व पक्षांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करावा, CJP कडून प्रेस रिलीज काढत आवाहन

Vidarbha Travel : गुलाबी थंडीत करा विदर्भाची सफर, 'ही' ७ सुंदर ठिकाणे पाहून पुन्हा पुन्हा येथेच ट्रिप प्लान कराल

Delimitation Bill: शरद पवारांचा डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Bike Care: पेट्रोल पंपवर बाइक सुरू असताना पेट्रोल भरणं योग्य आहे का?

400 पार'नंतर आता '800 पार'! भाजपला कायम सत्तेत राहायचंय? काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितली मोदींच्या रणनीतीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT