Solapur Anganwadi Worker Heart Attack Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अंगणवाडी सेविकेला हार्ट अटॅक; अवघ्या १० मिनिटातच गेला जीव

Solapur Anganwadi Worker Heart Attack : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना एका अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय.

विश्वभूषण लिमये

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला ठिकठिकाणी गर्दी करीत आहेत. अशातच सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना एका अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय.

सुरेखा रमेश आतकरे असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या मोहोळ (Solapur News) तालुक्यातील देगाव येथील अंगणवाडी क्रमांक १ मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचे काम सुरू होते. यावेळी अंगणवाडी सेविका असलेल्या सुरेखा यांना अचानक हृदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आला.

काही क्षणातच त्या खुर्चीवर कोसळल्या. मोठा आवाज झाल्याने भांडी स्वच्छ असलेल्या त्यांच्या मदतनीस धावत समोरच्या खोलीत आल्या. त्यावेळी त्यांना सेविका सुरेख आतकरे या खुर्चीत निपचित पडल्याच दिसून आले. आरडाओरड झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी अंगणवाडीकडे धाव घेतली.

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुरेखा यांना तत्काळ मोहोळ मधील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. सुरेखा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथामिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

शवविच्छेदनानंतर या घटनेची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सुरेखा यांच्या निधनामुळे संपूर्ण देगाव गावावरप शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात गुरुवारी सुरेखा यांच्यावर देगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT