nitesh rane saam tv
महाराष्ट्र

Solapur News: सोलापूर दगडफेक प्रकरण: आमदार नितेश राणे, टी. राजा यांच्यासह ८- १० जणांवर गुन्हा दाखल

Solapur Latest News: हिंदू जनआक्रोश मोर्चा सभेत चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश आणि आमदार टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Breaking News:

सोलापूरमध्ये (Solapur Stone Planting) हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकी प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या मोर्चा सभेत चितावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश आणि आमदार टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा आणि लव्ह जिहाद कायदा अमलात आणावा यामागणीसाठी सोलापूरमध्ये (Solapur) हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान मधला मारुती चौकात दोन गटात दगडफेक झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली. या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

या मोर्चा सभेत तेढ निर्माण करणारे, चितावनीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि आमदार टी. राजा (T. Raja) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांसह सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवडे आणि मंचावर उपस्थित 8 ते 10 पदाधिकाऱ्यांवर सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय दंड संहिता विधेयक कलम 153(अ),295(अ),188,34 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मोर्चाआधीच आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा सिंग यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याबाबात ही नोटीस होती. त्यानुसार आता त्यांची भाषण तपासून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT