सोलापूर : नोटरी पद्धतीने खरेदी केलेली तीन हजार स्क्वेअर फुटाची जागा कर आकारणीस नोंद करून घेण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. याकरिता ५० हजारांची लाच स्वीकारताना सोलापूर महापालिकेच्या वरिष्ठ मुख्य लेखनिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सोलापूर महापालिकेतील वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. महापालिका हद्दीमध्ये असलेल्या जागेची कर आकारणीस नावाची नोंद करण्यासाठी महापालिकेच्या कर विभागात तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यावेळी तक्रारदाराने लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल यांची भेट घेतली. त्यावेळेस दोंतुल यांनी तक्रारदाराला १ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च २००५ पर्यंतचा कायदेशीर दंड १ लाख ७७ हजार ७४५ रुपये भरण्यास सांगितले.
२१ हजाराचीच दिली पावती
दंड भरायचा नसल्यास ५० हजार रुपये द्यावे लागतील असे दोंतुले यांनी तक्रारदारास सांगितले. दरम्यान ५० हजारांमधून कर भरल्याची पावती देतो; असे सांगून मुख्य लेखनिकाने ५० हजाराची लाच स्वीकारली. त्यापैकी २१ हजार २५५ रुपयाची ऑनलाईन कर भरल्याची पावती तक्रारदाराला दिली. उर्वरित २८ हजार ७४५ रुपये लाच स्वतः स्वीकारली आहे. अशी माहिती लाच लुचपत विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यानुसार दोंतुले यास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा कर्मचारीही अडकला
रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा उपअभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. डॉ. प्रवीण मोरे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. श्रीवर्धनमधील सभागृहाच्या कामाचे १ लाख ४० हजार रूपयांच्या बिल मंजुरीसाठी टाकण्यात आले होते. याकरिता १३ हजार रूपयांची मागणी मोरे याने केली. त्यानुसार १० हजार रुपये स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.