Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे अस्तित्व धोक्यात; भरावासाठी महामार्गालगत टाकलेल्या मुरुमाचे उत्खनन

Buldhana News : नागपूर ते मुंबई हे अंतर कमी वेळात जाता यावे यासाठी समृद्धी महामार्ग हा महत्वाकांक्षी मार्ग साकारला जात आहे. काही टप्प्यातील काम पूर्ण झाले असून काही टप्पा पूर्ण होणे बाकी आहे
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On

बुलढाणा : महायुती शासनाचा त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी असलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्णपणे सुरू होण्याआधीच या महामार्गाच अस्तित्व धोक्यात आल्याचे पाहण्यास मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगावजवळ महामार्गालगत मुरुमाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यामुळे समृद्धी महामार्ग पोखरला जातोय का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. 

नागपूर ते मुंबई हे अंतर कमी वेळात जाता यावे यासाठी समृद्धी महामार्ग हा महत्वाकांक्षी मार्ग साकारला जात आहे. काही टप्प्यातील काम पूर्ण झाले असून अद्याप या महामार्गाचा काही टप्पा पूर्ण होणे बाकी आहे. यामुळे ७०१ किलोमीटरचा व ५५ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या महामार्गाचे अस्तित्व बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगावजवळ आता धोक्यात आले आहे. 

Samruddhi Mahamarg
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; लातूर, धाराशिवमध्ये आंदोलन, सोलापुरातही शेतकरी आक्रमक

महामार्गाला तळे जाण्याची भीती 

डोणगाव शिवारात समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला भरावासाठी टाकण्यात आलेल्या मुरुमाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. परिणामी या महामार्गाला आता तडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. खरंतर समृद्धी महामार्ग हा जमिनीपासून वीस फूट उंच भराव टाकून तयार करण्यात आलेला महामार्ग आहे. मात्र आता समृद्धीच्या बाजूने टाकण्यात आलेल्या या मुरमाचा भराव आता गौण खनिज चोर रात्रीच्या वेळेस जेसीबी लावून चोरून नेताना बघायला मिळत आहे. आणि त्यामुळे या महामार्गाला आता तडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

Samruddhi Mahamarg
Ambajogai News : चोरी करायला आले; सायरन वाजताच चोरट्यांची पळता भुई थोडी, घटना सीसीटीव्हीत कैद

प्रशासनाचे दुर्लक्ष 

डोणगाव शिवारातच अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गाला लावलेल्या संरक्षण जाळ्या सुद्धा तोडून नेण्यात आलेल्या आहेत. समृद्धी महामार्ग प्रशासनाला ही बाब माहिती असूनही यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अद्याप समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे सुरू झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच आता समृद्धी महामार्गाला गौण खनिज चोरांच ग्रहण लागल्याच चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com