solapur  Saam tv
महाराष्ट्र

भयंकर! कॉलेजमधून घरी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात २ जिवलग मैत्रिणींचा करुण अंत

solapur mohol accident : कॉलेजमधून घरी जाताना दोन जिवगल मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे. दोघींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

विश्वभूषण लिमये

राज्यात अपघातांची मालिका

सोलापुरात भीषण अपघातात जिवलग मैत्रिणींनी गमावला जीव

अपघातानंतर गावात एकच खळबळ

राज्यात अपघातांची मालिका सुरू आहे. सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. मोहोळ तालुक्यातील भीषण अपघातात दोन जिवलग मैत्रिणींना जीव गमवावा लागला आहे. मोहोळ तालुक्यातील नजिक पिंपरी गावाजवळ ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात टेम्पोने धडक दिल्यामुळे दोन जिवलग मैत्रिणींना गमवावा लागला आहे. मोहोळमधील पिंपरी गावाजवळ हा अपघाताचा थरार पाहायला मिळाला.

अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची मैत्रीण बारावीत शिकणारी स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. प्रज्ञा ही स्कुटीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.

टेम्पोच्या धडकेत प्रज्ञा जागीच ठार झाली तर स्नेहल ही गंभीर जखमी झाली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या स्नेहलला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

प्रज्ञा ही अकरावीत नेताजी महाविद्यालयात शिकत होती. तर इयत्ता बारावीची विद्यार्थिनी स्नेहल ही राष्ट्रमाता इंदिरा कन्या महाविद्यालयात शिकत होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून महिला जागीच ठार

नंदूरबारच्या शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील वनविभाग कार्यालयासमोर भीषण अपघात घडला. दोन दुचाकींच्या अनपेक्षित हालचालीमुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. शहादा शहराकडे एक दुचाकी जाताना समोरून अचानक दुसरी दुचाकी आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.

दुचाकीच्या मागे बसलेल्या महिलेचा तोल गेला आणि ती थेट रस्त्यावरून जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आली. अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. उसाच्या वाहनांची वाढती वर्दळ आणि अरुंद रस्ते यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Uddhav Thackeray : मध्यरात्री शिंदेंचं ऑपरेशन टायगर अन् ठाकरेंना जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत तडकाफडकी प्रवेश

लातूर हादरले! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; अमानुष कृत्यामागील कारण वाचून चीड येईल

Belapur Tourism : पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह फिरून कंटाळलात? मग बेलापूरजवळील 'हा' समुद्रकिनारा एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT