Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार; लातूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात दमदार पाऊस

Latur Solapur News : पावसाची थोडी उघडीप मिळाल्याने शेतकरी पीक काढण्याच्या कामाला लागला होता. मात्र पाच दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली असून काही ठिकाणी रात्रीपासुनच जोरदार पाऊस

Rajesh Sonwane

लातूर/ सोलापूर : राज्यात मागील आठवड्यात जोरदार पावसाने झोडपून काढले होते. यानंतर मागील पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरवात झाली आहे. यात धाराशिव जिल्ह्यात झोडपून काढल्यानंतर लातूर जिल्ह्यात व सोलापूरच्या बार्शी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. 

राज्यात मागील दोन आठवडे जोरदार पावसाने हाहाकार माजविला होता. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात पावसाची थोडी उघडीप मिळाल्याने शेतकरी पीक काढण्याच्या कामाला लागला होता. मात्र पाच दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली असून काही ठिकाणी रात्रीपासुनच जोरदार पाऊस होत असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

बार्शी तालुक्यात चार दिवसाच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील आगळगाव येथून वाहणारी चांदणी नदी झाली ओव्हर फ्लो झाली आहे. तर आगळगाव उंबरगे गावाला जोडणारा चांदणी नदीवरचा पूल पाण्याखाली गेला असून चांदणी नदीवरील पुलासह बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. तर पुलावरून पाणी वाहत असल्याने पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. शिवाय अचानक पडलेल्या पावसामुळे सोयाबीन, कांदा, उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. 

लातूर जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी
लातूर जिल्ह्यात मागच्या पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या काही भागात रात्री मेघगर्जनासह पावसाने हजेरी लावली. यावेळी अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. निलंगा तालुक्यातील उस्तुरी, टाकळी, बडूर या मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. र पावसामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.तर  प्रशासनाने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : नातं कायमच तुटलं! स्मृतीने पलाशला सोशल मीडियावरूनही केलं अनफॉलो

Maharashtra Live News Update: बैलगाडा शर्यतीत मुलींचा सहभाग ठरला लक्षवेधी

Shivaji maharaj diet: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायचा?

स्मृतीने अखेर लग्नावर मौन सोडलं, मोठा निर्णय घेतला; पलाशचीही त्याच वेळी पोस्ट.. वाचा कोण काय म्हणाले

Chapati Side Effects: चपातीमुळे वाढतं वजन अन् शुगर वाढते का? अमेरिकन ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT