solapur saam tv
महाराष्ट्र

Crime news : झारखंड, नेपाळच्या युवकांचा बँक लुटण्याचा कट सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उधळला, 13 जणांची पाेलीस काेठडीत रवानगी

स्थानिक गुन्हे शाखेची कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : बँक लुटाण्याच्या तयारीतील 13 जणांना सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलं आहे. पाेलीसांनी त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह 6 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. (Maharashtra News)

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतून देण्यात आलेल्या माहितीनूसार अटकेतील संशयित हे उत्तर भारतासह नेपाळमधील (nepal) आहेत. ते गॅस कटरच्या साहाय्याने बँक, सराफ दुकाने फोडण्यात सराईत आहेत. त्यांना न्यायालयात (court) हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयितांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयितामध्ये झारखंड आणि नेपाळमधील येथील युवकांचा या घटनेत समावेश आहे. राज कामी, दीपक जमाई, मुरसलीम शेख, इनामुल शेख, सुरज उलहक, मोहम्मद शेख, कमरुद्दीन शाहजुल, इंदामुलक शेख, शिवसिंग देवल, टिकाराम कोली, विक्रमसिंह नेगी, भरसाऊथ अर्कसाऊथ अशी अटकेत असलेल्या संशयित्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर फुटले; नेमका प्रकार काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Pune Tourism : पुणे फिरण्याचा प्लान करताय? मग 'हे' ठिकाण लिस्टमध्ये ठेवाच

Raghav Juyal : राघव जुयालने लोकप्रिय अभिनेत्रीच्या थोबाडीत मारली? पाहा व्हायरल VIDEO मागचे सत्य

Mandale to Chembur Metro : मुंबईकरांची प्रतिक्षा संपणार; मंडाळे ते चेंबूर मेट्रो महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता | VIDEO

SCROLL FOR NEXT