Free Driving License Scam विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूर: बार्शीत मोफत ड्रायव्हिंग लायसन्स घोटाळा; राजेंद्र गायकवाडसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

एक हजार लोकांकडून लर्निंग लायसन्ससाठी प्रत्येकी 400 तर दीडशे ते दोनशे जणांचे 1500 रुपये लंपास

विश्वभुषण लिमये

विश्वभुषण लिमये

सोलापूर: जिल्ह्यातील बार्शीमध्ये अजून एक घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा लायसन्स घोटाळा म्हणून बार्शीत चर्चिला जात आहे. बार्शीतल्या एका ठगाने ड्रायव्हिंग लर्निंग लायसेन्सचे मोफत शिबिर आयोजित करून पक्के लायसन्स कोणत्याही ट्रायल शिवाय देतो म्हणून लोकांकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा लोकांनी लायसन्ससाठी तगादा लावला तेव्हा ट्रायलसाठी शिबीर ठेवणार असल्याचे सांगून तो फरार झाला. 

बार्शीतल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (निकाळजे गट) पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष असलेल्या  राजेंद्र गायकवाड याने वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) असताना मोटार ड्रायव्हिंगचे मोफत लर्निंग लायसन्स देण्याचे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी केले होते. मोठ्या गाजवाजाने केलेलं हे शिबिर घोटाळ्याचे शिबीर होतं हे बार्शीकरांना नंतरच समजले!

मोफत शिबिराचा बोर्ड लावून पक्के लायसन करून देतो म्हणून गायकवाड याने मागच्या दारातून पैसे उकळले, विशेष म्हणजे या शिबीरात आर. टी. ओ. (RTO) चे अधिकारी देखील उपस्थित होते. या शिबिराला कोणतीही शासकीय परवानगी देखील घेण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच या शिबिरात राजेंद्र गायकवाड याने एक हजार लोकांकडून लर्निंग लायसन्ससाठी प्रत्येकी 400 तर दीडशे ते दोनशे जणांकडून 1500 रुपये उकळल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

हे देखील पहा-

राजेंद्र गायकवाड याच्यावर शिबिर घेऊन मोफत ड्रायव्हिंग लायसन देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केलेप्रकरणी बार्शी शहर स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्यात राजेंद्र गायकवाड सोबत ओम राजेंद्र गायकवाड आणि जोतीराम मोहन जाधव या दोघांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ठगाने जवळपास 1000 जणांना फसवलंय, त्यामुळे फसवणूक झालेल्या नागिरकांनी पुढे येऊन तक्रारी देण्याचे आवाहन बार्शी पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अमरावती जिल्ह्यातील काय स्थिती, कुणाला आघाडी?

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT