बिग बजेट RRRच्या मेगा रिलीजपूर्वी थेटरमध्ये लावले खिळे; काय असेल कारण?

साउथ सुपरस्टार राम चरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर यांचा (RRR Movie) येत्या 25 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Nails Planted In Theaters Before RRR Release
Nails Planted In Theaters Before RRR Release Twitter/@ANI
Published On

नवी दिल्ली: साउथ सुपरस्टार राम चरण तेजा, ज्युनियर एनटीआर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा (RRR Movie) येत्या 25 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (RRR Movie Promotion) व्यस्त आहेत. रिलीजपूर्वी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगची जय्यत तयारी सुरू आहे. सध्या या तयारीचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. सध्या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ पाहता आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) थिएटर मालकही सतर्क झाले आहेत.

Nails Planted In Theaters Before RRR Release
संतापजनक! भंडाऱ्यात डॉक्टरांची शिपायाला लाथा-बुक्यांनी मारहाण; Video कैद

आंध्र प्रदेशच्या एक थेटरमध्ये स्क्रीनच्या पुढे काटेरी तारांचे कुंपण बांधले आहे होते. त्याचप्रकारे पुन्हा आणखी एका थिएटरमधून असेच एक चित्र समोर आले आहे जिथे चाहत्यांना स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी धारदार खिळे लावण्यात आले आहेत. व्यंकटेश्वरलू अन्नपूर्णा थिएटरमध्ये स्क्रीनसमोर खिळा लावण्यात आला आहे,' यावर थिएटरच्या मालकांनी सांगितले की, आम्ही असे करत आहोत कारण की, एवढा मोठा चित्रपट पाहताना फॅन्स उत्साहित होऊ शकतात, स्टेजवर चढू शकतात, गोंधळ घालू शकतात आणि यामुळे स्क्रीन खराब होऊ शकते.

एका चित्रपटासाठी चित्रपटगृहात पडद्यासमोर (Screen) चक्क धारदार खिळे बसवण्याची ही पहिलीच वेळ असेल. तर, अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली, राम चरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यूपीमधील वाराणसीला गेले होते. याठिकाणी दशाश्वमेध घाटावरील गंगा आरतीतही ही RRR टीम सहभागी झाली होती. तेव्हाही त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com