Solapur Flood Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Flood: सोलापुरात पावसाचा हाहाकार! सीना नदीला महापूर, पूराचे पाण्याचा २६ गावांना वेढा; १८०० ग्रामस्थ अडकले

Solapur Heavy Rainfall: सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी गावात आणि शेतामध्ये शिरलं आहेत. या पूरामुळे २६ गावांचा संपर्क तुटला आहे.

Priya More

Summery -

  • सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं.

  • या पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे.

  • पूरामुळे २६ गावांचा संपर्क तुटला आहे.

  • पूरात अडकलेल्या १८०० ग्रामस्थांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. माढा आणि करमाळा तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. सीना नदीला आलेल्या पूरामुळे २६ गावांना फटका बसला आहे. दोन्ही तालुक्यातील १,८०० ग्रामस्थ पुरामध्ये अडकले होते. या सर्वांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील १० गावांचा देखील संपर्क तुटला आहे. संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. तर करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी हातात काठी घेऊनच परिस्थितीत धोकादायक वाहतूक करू पाहणाऱ्या नागरिकांना परतवून लावले आहे.

अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने सीना, कोळेगाव धरण क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने ५२ हजार क्यूसेक वेगाने सीना नदीपात्रात पाणी सोडले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील २६ गावांना पुराचा फटका बसला आहे. करमाळा तालुक्यातील ६५० ग्रामस्थांना स्थलांतर सुरू केले आहे. माढा तालुक्यातील १,२०० ग्रामस्थांचे देखील स्थलांतर करण्यात येत आहे. आज संध्याकाळनंतर करमाळा आणि माढा तालुक्यातील पूरस्थिती गंभीर होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीचे पाणी गावात शिरायला सुरुवात झाली आहे. मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी गावात नदीपात्रापासून १ किलोमीटर अंतरावर शेतात पाणी घुसले आहे. त्यामुळे सोयाबीन, तुर, कांदा, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २ लाख क्यूसेक वेगाने सीना नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सीना नदीला महापूर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापुरातील बार्शी तालुक्याला कालरात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. बार्शी तालुक्यातील चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चांदणी नदीला पूर आल्याने गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस पिंपळगाव, देवगाव आणि कांदलगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबिन आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Travel : इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत करा किल्ल्यावर भटकंती, 'हे' ठिकाण यादीमध्ये पाहिजेच

Kitchen Hacks : बटाटा ५ मिनिटांत उकडेल, हा सुपर हॅक एकदा नक्कीच वापरा

BJP : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

SCROLL FOR NEXT