Solapur: सीना नदी परिसरात पूरसदृश्य स्थिती; पाकणीचा पूल पाण्याखाली विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

Solapur: सीना नदी परिसरात पूरसदृश्य स्थिती; पाकणीचा पूल पाण्याखाली

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापूर Solapur जिल्ह्यातील मोहोळ Mohol आणि माढा Madha तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे Heavy Rain सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे सीना नदी Sina River परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.

हे देखील पहा-

उत्तर सोलापूर North Solapur तालुक्यातील पाकणीचा पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे. तर पाकणी Pakni आणि विरवडे गावचा संपर्क ही तुटला आहे.

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन ही सतर्क झाले असून नदीच्या काठावर असलेली गावे तसेच घरांना सतर्कतेचा सूचना करण्यात आल्या आहेत.

2020 मध्ये ही सीनेला अनेक वर्षांनंतर मोठा पूर आला होता, त्यामुळे सोलापूर-मंगळवेढा, सोलापूर-विजापूर संपर्क तुटला होता. हजारोंच्या संख्येने घरांचे,शेतीचे नुकसान झाले होते.

आता सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नदीचे पाणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT