Solapur Heavy Rainfall Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Flood: माढ्यात पूरग्रस्त आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

Solapur Heavy Rainfall: सोलापूरमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. या पावसामुळे माढा तालुक्यात पूर आला असून मोठं नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला.

Priya More

Summary -

  • माढ्यात पूरग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत.

  • पुरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

  • तात्काळ नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे आश्वासन दिलं.

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले आहे. शेत जमिनी, पिकं, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे ६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जनावरं देखील दगावले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आज माढा दौऱ्यावर आले होते. सीना नदीला आलेल्या पुराची आणि नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी माढा तालुक्यातील सीना दारफळ आणि निमगाव येथे त्यांनी भेटी देऊन पाहणी केली. पाहणी केल्यानंतर ते माढ्याकडे परत येत असताना संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. 'आम्हाला सरकारने तातडीची मदत द्यावी.', अशी मागणी करत संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आश्वासन देऊ नये त्यांनी तात्काळ मदत द्यावी. आमचा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर विश्वास नाही. त्यांनी दिलेले आश्वासन म्हणजे लबाडा घरचं अवतान आहे.', अशा भावना माढा तालुक्यातील सीना दारफळ येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढा तालुक्यातील सीना दारफळ येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नियमांवर बोट न ठेवता शेतकऱ्यांना मदत केली जाईल ते आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला असता या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर नाराजी व्यक्त केली. हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि सांगली कोल्हापूरच्या धरतीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली. या भागातील शेतकऱ्यांच्या घरांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घरात पूराचे पाणी शिरल्यामुळे संसारउपयोगी साहित्य वाहून गेले. त्याचसोबत त्यांची जनावरं देखील दगावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भूम तालुक्यातील वालवड येथे फुटलेल्या तलावाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पहाणी

Relationship Tips : 34 ते 38 वयोगटातील महिला अफेअर का करतात? रिलेशनशिप कोचने सांगितलं सिक्रेट

Shocking: नीटमध्ये 99.99 टक्के, मला डॉक्टर व्हायचं नाही, अ‍ॅडमिशनच्या दिवशीच आत्महत्या, चंद्रपूरमधील हृदयद्रावक घटना

Rain Alert : अकोला जिल्ह्याला पाच दिवस पावसाचा इशारा; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

Rupali Bhosle: निळी साडी अन् केसात गुलाबाचं फूल, रूपालीचं सौंदर्य नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT