Solapur Fire News Saam TV
महाराष्ट्र

Solapur Fire News : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाची ८ वाहने घटनास्थळी दाखल

Fire News : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ruchika Jadhav

Solapur News :

सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे. एमआयडीसीतील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.

एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज पहाटे एका घराला आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील ७ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला आधी ही आग लागली.

त्यानंतर आग थेट वरच्या मजल्यावर असलेल्या घरापर्यंत पोहचली. पहाटेची वेळ असल्याने येथील व्यक्ती साखर झोपेत होते. या सर्वांना आजची सकाळ पाहता येणार नाही असा विचारही त्यांच्या मनात कधी आला नसेल. दुकानाजवळ एक इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंगला लावली होती. यामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली अशी माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT