महाराष्ट्र

Solapur: सांगा कसं जगायचं? सोयाबीनचं पीक पाण्यात, डोळ्यात अश्रूंचा पूर; दुसरीकडे कर्ज वसुलीसाठी बँकेकडून नोटीस

Solapur Farmer: सोलापूरमध्ये शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिक पावसामुळे पाण्यात गेले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कर्ज वसुलीसाठी न्यायालयाची नोटीस आली असून अस्मानी-सुलतानी संकटाने तो अडचणीत सापडला आहे.

Dhanshri Shintre

उत्तर सोलापूर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून कोसळणाऱ्या सततच्या मुसळधार पावसाने खरीप हंगाम अक्षरशः उध्वस्त करून टाकला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले सोयाबीनसह इतर पिकांचे चिखल झाले असून शेतकरी हाताची शेवटची राख राखेत उडाल्याने हताश झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अकोलेकाटी येथील शेतकरी नामदेव राजेंद्र माने यांच्यासाठी मात्र अडचणींचा डोंगर आणखीनच वाढला आहे.

नुकताच त्यांच्या शेतातील पिके मुसळधार पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाली असताना, त्यांना भारतीय स्टेट बँक नान्नज शाखेकडून थकबाकीच्या नोटिसा मिळाल्या आहेत. नामदेव माने यांनी २०२० साली १.५५ हेक्टर क्षेत्रासाठी ७५ हजार ४०० रुपयांचे पीककर्ज घेतले होते. मात्र वाढलेला खर्च, उत्पादनातील सततची घट आणि दुष्काळ तसेच पूर यांसारख्या वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे त्यांचे कर्ज थकित राहिले.

२० जून २०२५ रोजी बँकेकडून त्यांना थकबाकीची नोटीस देण्यात आली. नामदेव माने यांच्याकडे कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याने ते गप्प राहिले. एवढ्यावर बँकही न थांबता आता या प्रकरणाची दिवाणी न्यायालयात वसुलीसाठी नोंदणी केली गेली आहे. न्यायालयाकडून माने यांना ३ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याची समन्स नोटीस देण्यात आली आहे. यामुळे त्यांचे मानसिक ताण अधिकच वाढले आहेत.

सततच्या पावसामुळे त्यांच्या शेतात उभ्या सोयाबीन पिकात पाणीच पाणी साचले आहे. सोयाबीनचा चिखल झाला असून उत्पादन वाया गेले आहे. अशा स्थितीत कुटुंबासह नामदेव माने अत्यंत हतबल अवस्थेत जगत आहेत. नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये माने हे पिकाच्या चिखलात लोळून "सगळं पीक वाया गेलं रे, आता नोटीस आली मी काय करू?" असे म्हणत हंबरडा फोडताना दिसत आहेत.

या घटनेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आणि संतापाची लाट उसळली आहे. अस्मानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना बँक आणि न्यायालयीन नोटिशांचा भडिमार सहन करावा लागत आहे. प्रश्न असा उभा राहिला आहे की, शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतरच या नोटिसा थांबवणार आहे का? शेतकऱ्यांच्या वेदना आणि आजच्या परिस्थितीवरून हा विषय अधिक गंभीर बनला असून शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT