BANK ELECTION saam tv
महाराष्ट्र

जिल्हा बँक निवडणुकीत मातब्बर नेत्यांना हायकोर्टाचा मोठा धक्का; सहा माजी संचालकांचे याचिका फेटाळली

Solapur District Bank Election: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहा माजी संचालकांना हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने यांच्यासह सहा नेत्यांचे अपील फेटाळण्यात आले.

Omkar Sonawane

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मातब्बर नेत्यांना हाय कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. सहा माजी संचालकांनी उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेले अपील हाय कोर्टाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे या दिग्गज नेत्यांच्या उमेदवारीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, जयंतराव जगताप, संजयमामा शिंदे, सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सहा माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज फेटाळले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी प्रथम विभागीय सहनिबंधाकांकडे दाद मागितली होती. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती.

मात्र हाय कोर्टात निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय सहनिबंधक यांचे निर्णय कायम ठेवत सहा माजी संचालकांचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे या नेत्यांना मोठा राजकीय आणि निवडणुकीच्या दृष्टीने धक्का बसला आहे. आता या नेत्यांनी हाय कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आणि कोण माघार घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माघार

IAS Transfer: १६ IAS अधिकाऱ्यांसह ५ जिल्हाधिकाऱ्यांच्याही तडकाफडकी बदल्या, प्रशासनात मोठा फेरबदल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! पुन्हा ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात; १५०० रुपये कधी मिळणार?

Cancer : उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊनही पुन्हा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे

व्यवसाय करणाऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत कर्ज; PM विश्वकर्मा योजनेसाठी असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT