Solapur Mohl Taluka Crime News Saam TV
महाराष्ट्र

Solapur Crime : शेतजमिनीचा वाद विकोपाला, ४ वर्षीय पुतणीसोबत काकाचं भयंकर कृत्य; मन सुन्न करणारी घटना

वाद इतका विकोपाला गेला की नराधम काकाने आपल्या सख्या पुतणीची हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह सीना नदीत फेकला.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करण्यासाठी दोन भावांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की नराधम काकाने आपल्या सख्या पुतणीची हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह सीना नदीत फेकला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. ज्ञानदा यशोधन धावणे (वय ४ वर्ष) असं हत्या (Crime) करण्यात आलेल्या चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी यशोदीप धाकणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील डिकसळ इथला रहिवासी असलेल्या यशोधन शिवाजी धावणे यांची वडीलोपार्जित १६ एकर शेतजमीन आहे.

यातील ५ एकर जमीन ही त्यांच्या नावे आणि ५ एकर भाऊ यशोदीप यांच्या नावावर आहे. तर उर्वरित सहा एकर जमीन ही आईच्या नावे आहे. फिर्यादी यशोधन धावणे यांनी दिलेल्या जबाबानुसार आईच्या नावावर असलेली ६ एकर शेतजमीन ही आपल्या नावावर करुन द्यावी यासाठी आरोपी यशोदीप हा सातत्याने भांडण करत होता.

गावातील लोकांनी बैठक घेत त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र, तरीही त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान, सोमवारी (२० फेब्रुवारी) पुन्हा यशोधन आणि यशोदीप या दोन्ही भावात वाद झाला. आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीपने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकी दिली.

दरम्यान, गावकऱ्यांनी पुन्हा एकदा मध्यस्थी करत त्यांचे भांडण मिटवले. त्यानंतर चिमुकल्या ज्ञानदाचे वडील यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतात गेले. काही कामानिमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे घरात दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी वडील शिवाजी यांना फोन केला असता मी मंदिरात दर्शनासाठी आलो असून ज्ञानदा घरात झोपलेली असल्याचं सांगितलं.

मात्र, ज्ञानदा घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली असता भाऊ यशोदीपने ज्ञानदाला गाडीवर नेल्याचे काही जणांनी सांगितलं. यावेळी भाऊ यशोदीपला फोन लावल्यानंतर मी तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिलं असं सांगितलं. याप्रकरणी यशोधन यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी यशोदीप याच्याविरोधात पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ८ दिवसात खुशखबर मिळणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT