solapur news  Saam tv
महाराष्ट्र

MNS worker Killed : मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; सोलापूर हादरलं, धक्कादायक कारण उघड

solapur crime news : सोलापूर पुन्हा हादरलं आहे. राजकीय वादातून मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापुरात आणखी एकाची हत्या

मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या

मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येने परिसरात खळबळ

सोलापुरात इच्छुक उमेदवाराची हत्येची घटना ताजी असताना राजकीय वादातून आणखी एकाला संपवल्याची घटना समोर आली आहे. बाळासाहेब सरवदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब हे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते. सोलापुरात आणखी एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला. प्रभाग दोन मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठे वाद झाले. या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले.

दुसरीकडे शिंदे गटाच्या समर्थकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केलाय. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

तत्पूर्वी, या प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता. त्यामुळे सरवदे कुटुंबावर दबाव भाजप नेत्याकडून आणला जात होता, असा आरोप करण्यात येत आहे.

शहरात वाद नको म्हणून मनसे नेते बाळासाहेब सरवदे सोडायला गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केलाय. सरवदे यांच्या हत्येने सोलापुरात खळबळ उडाली आहे. तर सरवदे यांच्या मृत्यूने मनसे पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

तत्पूर्वी, सोलापुरातील राजकीय हत्याकांड प्रकारणात 11 संशयित आरोपी असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या वादात सोलापुरातील जेल रोड पोलिसांनी ४ आरोपीना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नॉयलॉन मांजा जीवावर उठला, पुण्यात पुलावर महिला गंभीर जखमी

महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची आहे; फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Saturday Horoscope : लाडक्या गणरायाला काजळ लावून नारळ अर्पण करावं; मेषसह ५ राशींच्या लोकांची लॉटरी लागणार

महायुती तुटली? शिंदेसेनेची भाजपविरोधात बंडखोरी

भाजपच्या बंडखोराला घरात कोंडलं! माघारीची भीती, समर्थकांची रणनीती

SCROLL FOR NEXT