solapur crime news
solapur crime news 
महाराष्ट्र

राख्या पाहताना ४ ताेळे साेने चाेरले; महिला सीसीटीव्हीत कैद

विश्वभूषण लिमये

solapur crime news साेलापूर : सराफाच्या दुकानात कामा निमित्त गेलेल्या महिलेच्या पिशवीमधून पाटल्या चाेरुन नेण्याचे घटना साेलापूरात नुकतीच घडली आहे. पाेलिसांनी या प्रकाराची माहिती मिळताच तातडीने सराफ दुकानात धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर अनाेळखी तीन महिला आणि एक मुलावर तात्पूरत्या स्वरुपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चाैकशी सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

येथील लकी चाैक येथे गणेश रामचंद्र आपटे अशी सराफी पेढी आहे. सध्या राखी पाेर्णिमा निमित्ता या पेढीत चांदीच्या आणि साेन्याच्या राख्या घेण्यासाठी ग्राहकांची वर्दळ आहे. या सराफी दुकानात प्रभावती शिरगिरेया या राख्या खरेदीसाठी गेल्या हाेत्या. तेथे राख्या पाहताना त्यांच्या पिशवीतून पाटल्या गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत त्यांनी दुकानात सांगितले. व्यवस्थापनाने तातडीने ही माहिती पाेलिसांना दिली.

पाेलिसांनी आपटे यांच्या सराफी दुकानास भेट दिली. घटनेची माहिती घेतली. शिरगिरेया यांनी पाटल्या बदलून घेण्यासाठी दुकानात आले हाेते. पाटल्या पिशवती ठेवल्या होत्या. राख्या पाहताना काेणी तरी चाेरल्याचे सांगितले. पाटल्या साधरणतः चार ताेळ्यांचे हाेत्या. त्यानंतर पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. सध्या तरी तीन महिला आणि एका मुलावर गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा कसून तपास करणार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | झिंगलेल्या पुण्यावर ड्राय डेचा उतारा! पुण्यात दिवसांचा ड्राय डे?

Maharashtra News Live Updates: ट्रिपल इंजिनमध्ये राष्ट्रवादी पक्ष नाही का? अमोल मिटकरींचा भाजपला सवाल

Health Tips: सकाळी लवकर उठण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या

CM Eknath Shinde : मराठा, ओबीसी आरक्षणावर सरकारची भूमिका काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात....

Sam Pitroda : सॅम पित्रोदा यांना काँग्रेसकडून मिळाली मोठी जबाबदारी; लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने केली होती कारवाई

SCROLL FOR NEXT