बैलगाडा शर्यतीनंतर हजाराेंच्या उपस्थित पडळकर म्हणाले...

gopichand padalkar at bullock cart race venue
gopichand padalkar at bullock cart race venue
Published On

सांगली : पाेलिस हे आपल्याच शेतक-यांची मुले आहेत. त्यांना काेणीही काही बाेलू नका असे आवाहन हजाराेंच्या संख्येने जमलेल्या बैलगाडा शर्यतप्रेमींना आमदार गाेपीचंद पडळकर यांनी केले. यावेळी त्यांनी पुढचं आंदाेलन विधानसभेवर करणार असल्याचे जाहीर करताच उपस्थितांनी घाेषणा गाेपीचंद पडळकर आगे बढाे हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा देत पाठींबा दर्शविला.

आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास सांगलीच्या झरे एेवजी आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील घाट माथ्यावर गनिमा काव्याने बैलगाडी शर्यत पार पडली आहे. त्यानंतर आमदार गाेपीचंद पडळकर हे बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी पाेहचले gopichand padalkar at bullock cart race venue तेथे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

तेथे त्यांनी दहा दहा १५ किलाेमीटर तुम्ही चालत या ठिकाणी पाेहचल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आमदार पडळकर म्हणाले झरे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून पाेलिस अधिका-यांनी बैलगाडा शर्यत घेऊ नये अशी विनंती केली. त्यामुळे तेथे बैलगाडा शर्यत हाेऊ शकली नाही. या भागात काही शेतक-यांनी बैलगाडा शर्यत आयाेजित केल्याची आम्हांला समजले. त्यामुळे या चळवळीला काेणतेही गालबाेट लागू नये याची आपण सर्वांना काळजी घेतली पाहिजे.

बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी आपण माेठा संघर्ष उभा करु. गाेवंश वाचविण्यासाठी, संस्कृती वाचविण्यासाठी आपण ठाेस पावले उचलू. शर्यत सुरु झाल्यास कत्तलखान्याकडे जाणारी बैलं थाेपविण्यात आपल्याला यश येईल असा विश्वासही आमदार पडळकरांनी व्यक्त केला.

पाेलिस हे आपल्याच शेतक-यांची मुले आहेत. त्यांना काेणीही काही बाेलू नका असे आवाहन जमलेल्या बैलगाडा शर्यतप्रेमींना आमदार पडळकर यांनी केले. यावेळी उपस्थितांनी आमदार गाेपीचंद पडळकरांना पाठींबा दर्शवित घाेषणा दिल्या. त्याच वेळी आमदार पडळकरांनी या भागात मुंबई पुण्याहून लाेक येत आहेत. त्यांना सहकार्य करा असे आवाहन उपस्थितांना केले.

gopichand padalkar at bullock cart race venue
'...तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल'

आता यापुढचं आंदोलन थेट विधानसभेवर असे आमदार गाेपीचंद पडळकर यांनी जाहीर केले. महात्मा फुले यांच्या जन्मगावी कटगुण या ठिकाणाहून लवकरच बैलगाड्यांचा भव्य मोर्चा विधानसभेवर काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com