Solapur Crime News: सोलापूरमधील वृद्ध दांपत्याच्या घरातील चोरीस गेलेले 36 तोळे सोने आणि 25 तोळे चांदी असा एकूण 17 लाख 92 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. ही चोरी घरातील नोकरानेच केल्याचे पोलिस तपासात समोर आले. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरमधील (Solapur) जोडभावी पेठेत तारा चंडक आणि गिरीश चंडक हे वृद्ध दांपत्य वास्त्यव्यास आहेत. त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त बाहेरगावी राहण्यास आहेत. त्यांच्या घरातील तिजोरीतून मार्च 2021 ते मे 2023 दरम्यान 36 तोळे सोने आणि 25 तोळे चांदी असा 17 लाख 92 हजाराचा ऐवज चोरीस गेला होता.
मात्र घराचा गडी कोयंडा तोडून ही चोरी झाली नव्हती. त्यामुळे हा गुन्हा चंडक दांपत्याच्या संपर्कातील कुणीतरी केला असावा असा संशय पोलिसांना निर्माण झाला. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला. हा तपास करताना पोलिसांना घरातील नोकरावर संशय आला, ज्यानंतर त्याची शोधाशोध सुरू केली.
हा विश्वासू नोकर श्रीनिवास पगडीमाल हा पुण्याला पळून जाताना त्याला सोलापुरातच पोलिसांनी गाठले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ सोने आणि चांदी आढळून आली. दरम्यान, त्याच्याकडून 36 तोळे सोने आणि 25 तोळे चांदी असा एकूण 17 लाख 92 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.