Solapur Corporation Saam tv
महाराष्ट्र

Solapur Corporation : महापालिकेचा अजब कारभार; सोलापूर विकास आराखड्यात साताऱ्याच्या जलमंदिराचा समावेश

Solapur news : सोलापूर महापालिकेच्या विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर हरकत घेण्यासाठी ३१ जानेवारी शेवटचा दिवस होता. या आराखड्यावर दोन हजाराहून अधिक हरकती आल्या आहेत

विश्वभुषण लिमये

सोलापूर : सोलापूर महापालिका प्रशासनाने नव्या सुधारित विकास योजनेचा प्रारूप आराखडा (डीपी) तयार करताना सातारा शहराची कॉपी केली आहे. महापालिका प्रशासनाचा हा अजब कारभार समोर आला आहे. सोलापूरच्या या आराखड्यात अजिंक्यतारा फोर्ट, जलमंदिर राजवाडा, चार भिंती, बदामी- विहीर आदी गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी आणि आराखडा रद्द करावा; अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे केली आहे.

सोलापूर महापालिकेच्या विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर हरकत घेण्यासाठी ३१ जानेवारी शेवटचा दिवस होता. या आराखड्यावर दोन हजाराहून अधिक हरकती आल्या आहेत. यात भाजप शहराध्यक्षांनी तर थेट हा आराखडा रद्द करावा, अशी मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना अपेक्षित असलेला आराखडा तयार केलेला नाही. चुकीची लोकसंख्या दाखवून आराखडा तयार केल्याचा आरोप केला आहे. 

आराखडा कॉपी पेस्ट 

हद्दवाढ भागात सार्वजनिक उद्याने, नाट्यगृह, क्रीडांगणे, हॉस्पिटल, शाळा, वाहनतळ अशा अनेक सुविधांची गरज आहे. आराखड्यात याचा कोणताही विचार झालेला नाही. तर सोलापूर शहरात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे; हे सांगताना आराखड्यातील पान क्र. २५३ वर अजिंक्यतारा किल्ला, जलमंदिर, चार भिंती, बदामी विहीर आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी कॉपी पेस्ट केल्याचे दिसून येत असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांना देणार निवेदन 

दरम्यान सोलापूर महापालिकेने तयार केलेल्या आराखड्यावर भाजपचे शहराध्यक्ष निलेश काळे यांनी आक्षेप घेतला असून आराखडा कॉपी पेस्ट करणाऱ्या सर्वांवर कारवाई होऊन आराखडा रद्द करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती नरेंद्र काळे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi Kheer Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? फक्त १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर

Gayatri Datar Photos: गायत्री दातारचं सौंदर्य, पाहताच जीव दंगला, रंगला...

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्यासोबत उठणं बसणं सुरुच राहणार - राज ठाकरे

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कोणी केला?

Rohit Arya:'शिक्षणमंत्र्यांनी' 2 कोटी थकवल्याचा आरोप; रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकर काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT