Shiv Sena (Shinde faction) and Ajit Pawar-led NCP leaders during alliance discussions ahead of Solapur civic elections. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Election: सोलापुरात भाजपला डच्चू; शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; फॉर्म्युलाही ठरला

Solapur Civic Polls: सोलापूर निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला देखील अंतिम झालाय. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Bharat Jadhav

  • सोलापुरात भाजपला डच्चू, नवी राजकीय समीकरणं तयार

  • शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी एकत्र

  • महापालिका निवडणुकीआधी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

राज्यातील महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहे. अनेक ठिकाणी नव-नवीन युती आणि आघाडी बनत आहेत. काही महापालिका क्षेत्रात युती आणि आघाड्यांचं गणित बिघडलंय. त्यामुळे अशा ठिकाणी वेगळीच युती पाहायाला मिळतेय. पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता सोलापुरतही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना महायुतीचं गणित कोलमडलंय. त्यानंतर आता सोलापुरात महायुतीमध्येच वाद पेटलाय. येथे भाजपला डालवत एकनाथ शिंदेंची शिवसेना अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती होणार आहे.

सोलापूर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा १०२ जागांपैकी ५१-५१ जागांचा फॉर्म्युला ठरलाय. दरम्यान भाजपकडून सन्मानजनक जागा न दिल्याने शिंदे गटाने राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात युतीबाबत चर्चा झाली. सोलापूर महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युतीची बोलणीतून काहीच मार्ग निघत नव्हता.

शेवटी शनिवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीच्या हालचालींनी वेग पकडला. आज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली. त्यामध्ये युतीची घोषणा करण्यात आली. शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेतून याबाबत माहिती दिली. यासह त्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला. आमच्याकडे शिवसेना-राष्ट्रवादी, अशी दोघांची युती झाली.

५० टक्के समान जागा वाटपाचा निर्णय झाला. महापालिकेच्या १०२ जागांपैकी ५१-५१ जागा दोघांच्या वाट्याला येणार आहेत. दोघांचाही महापौर सोलापूर महापालिकेत असतील. राज्याच्या सत्तेतदेखील आम्ही सोबत आहोत. याशिवाय नगरविकास आणि अर्थ खाते राज्यात आमच्या नेत्यांकडे आहे. त्याचा वापर करून सोलापूरचा मोठा विकास आम्ही करू, असे सिद्धाराम म्हेत्रे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT