Devendra Fadnavis Reaffirms Ladki Bahin Scheme saam tv
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा, लवकरच नवी योजना सुरु करणार; महिलांमध्ये आनंदाचं वातावरण

Devendra Fadnavis Reaffirms Ladki Bahin Scheme: सोलापूरच्या अक्कलकोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींसाठी नव्या योजनेबाबत आश्वासन दिलं.

Bhagyashree Kamble

विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं. या यशामागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. वर्षपूर्ती झाल्यानंतरही ही योजना अखंडितपणे सुरू आहे. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या प्रचारासाठी नेते मंडळी मैदानात उतरले आहेत. प्रचारसभांमध्ये लाडकी बहीण योजनेचा विशेष उल्लेख केला जातो. विरोधकांकडून ही योजना लवकरच बंद होईल, असा दावा केला जात आहे. मात्र, 'जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही', असं त्यांनी ठामपणे सांगितलं. आज मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री बोलत होते.

सोलापूरच्या अक्कलकोट येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार देखील उपस्थित होते. भाजप अक्कलकोट, मैनदर्गी आणि दुधणी या ३ नगरपरिषदांमध्ये निवडणूक रिंगणात उतरला आहे. अक्कलकोटसाठी मिलन कल्याणशेट्टी, दुधणी नगरपरिषदसाठी अतुल मेळकुंदे आणि मैनदर्गी नगरपरिषदेसाठी अंजली बाजारमठ हे अधिकृत उमेदवार आहेत.

उमेदवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी अक्कलकोटमध्ये दाखल झाले. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्यांनी अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींसाठी विशेष आणि महत्त्वाची घोषणा केलीये.

प्रचारसभेत मुख्यमंत्री म्हणाले, 'आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणारी लोक आहोत. आम्ही पळून जात नाही', असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी 'जोपर्यंत तुमचा देवा भाऊ राज्याचा मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत मुख्यमंत्री लडकी बहीण योजना बंद होणार नाही', असंही त्यांनी छातीठोकपणे सांगितलं.

लाडक्या बहिणींसाठी खास घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणतात, 'आमच्या लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी बनवायचं आहे. पुढच्या वर्षी १ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार आहोत', असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. फडणवीस यांनी दिलेल्या घोषणेमुळे सभेत उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांची धक्का एक्स्प्रेसस सुसाट! बड्या नेत्यांनी हाती बांधले घडयाळ

Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभूच्या हाउंडस्टूथ प्रिंट सिल्क साडीने वेधले नेटकऱ्यांचं लक्ष, पाहा ग्लॅमरस फोटो

Maharashtra Live News Update: यवतमाळ पालिकेत भाजपचा बंडखोर विजयी

AMK Trek : सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात कठीण अन् साहसी ट्रेक, एकाच वेळी अनुभवाला 3 किल्ल्यांचा थरार

आता WhatsApp Call सुद्धा रेकॉर्ड होतील, फॉलो करा या 4 स्टेप्स

SCROLL FOR NEXT