Zp School Saam tv
महाराष्ट्र

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Solapur News : शाळेची इमारतीची निगा राखण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग किंवा ग्रामपंचायतीची आहे. मात्र जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बोट दाखवून जबाबदारी झटकतात

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था सर्वदूर सारखीच पाहण्यास मिळते. शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची वानवा कायम आहे. अशाच प्रकारे बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था शाळेतील चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनीने पत्राच्या माध्यमातून सरपंच आणि ग्रामसेवक समोर मांडली. पत्रातून समस्यांचा पाढा वाचत भौतिक सुविधा सुधारण्याची मागणी केली आहे. 

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील तडवळे गावात जिल्हा परिषदेच्या शाळा असून या शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इयत्ता चौथी शिकणाऱ्या आरुषी पवार हिने सरपंच आणि ग्रामसेवकांना पत्र लिहून व्यथा मांडल्या आहेत. तळवळे गावच्या जिल्हा परिषद शाळेत ४४ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षिका असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद असणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे आरुषीने आपल्या पत्राच्या माध्यमातून पोट तिडकीने अनेक समस्यांची जाणीव करून दिली आहे.

शाळा इमारत दुरावस्थेची केली जाणीव  
इयत्ता चौथीमध्ये शिकणारी चिमुकली आरुषी किरण पवार रोज न चुकता शाळेत येते. मात्र शाळेत आल्यानंतर सुविधांचा वनवा दिसून येतो. जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत दुरवस्था झाली आहे. वाऱ्यामुळे हालणारे पत्रे; अशा अनेक समस्यांचा उल्लेख केला आहे. शाळेच्या आवारामध्ये पिण्याचा पाण्याची सोय नसणे. ज्या वयात पत्रलेखन शिकायचे, त्या वयात पत्राद्वारेच समस्या मांडायची जबाबदारी ही चिमुकली पार पाडत आहे.

जबाबदारी झटकतात 
प्रत्येक गावातील असणारी प्राथमिक शाळेची इमारतीची निगा राखण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग किंवा ग्रामपंचायतीची आहे. मात्र जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत विभागांनी कोणत्या ना कोणत्या कारणावरून बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसून येतात. शाळा बंद पडू नयेत म्हणून ग्रामस्थांनी आपले आद्य कर्तव्य समजून पुढे येणे गरजेचे आहे. तरच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचे शिक्षण सक्षमपणे पूर्ण करता येऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Flood: नांदेडमध्ये पाऊसहल्ला! संसार उघड्यावर, ५ जणांचा मृत्यू; जनावरेही गेली वाहून, विदारक परिस्थिती

Amruta Khanvilkar: पिवळ्या अनारकली ड्रेसमध्ये 'चंद्रा' च सौंदर्य खुललं, फोटो पाहा

Asia Cup India Squad : हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी, आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड

Maharashtra Rain Live News: रायगड जिल्ह्यात घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार; जिल्ह्यातील १४ धरण ओव्हर फ्लो

SCROLL FOR NEXT