SOLAPUR SHOCKER: MOTHER ACCUSED OF KILLING 10-MONTH-OLD DAUGHTER IN BARSHI, ARRESTED BY POLICE Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : "...आई मला मारू नकोस" गळा दाबला, बादलीत बुडवलं; निर्दयी महिलेने पोटच्या १० महिन्यांच्या मुलीची केली हत्या

Solapur Crime News : सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या कथित छळाला कंटाळून १० महिन्यांच्या मुलीची आईने हत्या केली . आरोपी महिलेने स्वतः पोलिसांसमोर हजर होत कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • सोलापूरच्या बार्शीत १० महिन्यांच्या मुलीची हत्या

  • पतीच्या कथित छळाला कंटाळून आईने केली हत्या

  • आरोपी महिलेने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

  • सहा वर्षांच्या मोठ्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न

  • आरोपी महिलेवर गुन्हा दाखल

मुलाला ९ महिने पोटात वाढवणं आणि त्याला जन्म देणं या मातृत्वाच्या सगळ्यात कठीण काळात एक बाई आपला जीव पणाला लावते. मात्र एवढा त्रास आणि कठीण परिस्थितीशी संघर्ष करून एक आई आपल्या पोटच्या मुलाशी क्रूर कशी वागू शकते? असा प्रश्न उपस्थित करणारी संतापजनक घटना सोलापुरात घडली आहे. जन्मदात्या आईने अवघ्या १० महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे पतीच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील बार्शी येथील रहिवाशी असलेल्या पूजा खुर्दामळेचा पती योगेश खुर्दामळे हा तिचा छळ करायचा. पूजा आणि योगेशला दोन मुली आहेत. एक १० महिन्यांची तर दुसरी ६ वर्षांची. योगेशच्या सततच्या छळाला पूजा कंटाळली होती. दरम्यान तिने संतापाच्या भरात १० महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून पाण्याच्या बादलीत बुडवून निर्घृण हत्या केली.

पूजा एवढ्यावरच थांबली नाही तिने मोठ्या मुलीला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र “आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस,” अशी आर्त विनवणी केल्यानंतर तिने तिला सोडून दिल्याची माहिती आहे. हत्येनंतर मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन आरोपी महिला थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. “माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीची हत्या केली, मला अटक करा,” अशी कबुली तिने पोलिसांना दिली.

पोलिसांनी तातडीने मृत मुलीला रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी १० महिन्यांच्या शक्तीला मृत घोषित केले. तसेच मोठी मुलगी तेजल हिने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पूजा योगेश खुर्दामळे हिच्याविरुद्ध BNS कलम १०३(१) आणि १०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बार्शी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT