madha news  Saam tv
महाराष्ट्र

Solapur : शिवरायांच्या पुतळ्यावरून सोलापुरात वाद, तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक, पोलिसांवरही हल्ला

Solapur Shivaji Maharaj Statue Row : सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांमध्ये तुफान वाद झाला. पोलिसांवर आणि तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Namdeo Kumbhar, भरत नागणे

Chhatrapati Shivaji Maharaj Statue News : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून सोलापुरातील अंजनगाव खेलोबामध्ये मोठा राडा झाला. रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याने दोन गटात वाद निर्माण झाला. यामुळे गावात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. (Solapur Shivaji Maharaj Statue Row)

अंजनगाव खेलोबा या गावात माढा तहसीलदारांच्या गाडीवर संतप्त जमावाने दगडफेक केली होती. या दगडफेकीमध्ये गाडीची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झालाय. त्या वादातूनच रात्री संतप्त जमावाने पोलिसांवर देखील दगडफेक केली होती. याच दरम्यान तहसीलदारांच्या गाडीवर देखील जमावाने दगडफेक करून गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सध्या या गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस देखील मोठ्या प्रमाणावरती दाखल झाले आहेत.

पोलिसांनी लाठी चार्ज केल्यानंतर दगडफेक; स्थानिक ग्रामस्थांचा आरोप

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याचा वाद चांगलाच पेटला आहे. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांवर लाठी चार्ज करून मारहाण केली.त्यानंतर दगड फेक झाली. या घटनेला पोलिस जबाबदार आहेत, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर दोन गट आमने-सामने आले होते. रात्री पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला असता, काही तरुणांनी विरोध केला होता. यावेळी पोलिसांनी विरोध करणाऱ्या तरुणांवर लाटी चार्ज करून मारहाण केली. या मारहाणीमध्ये काही तरुणांची डोके फुटली तर अनेकांचे पाय मोडल्याचे समोर आले आहे. या घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जखमी तरुणांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी आता पुढे आले आहे.

गावात तणावपूर्ण शांतता

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे.त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान रात्री दगडफेकी मध्ये तहसीलदारांच्या गाडीचे नुकसान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून स्थानिक दोन गट आमने सामने आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे.असून गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात वाहन चालकाचा अजब प्रकार, चारचाकी वाहन चालकाची थेट डिव्हायडरला धडक

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ₹४६००० होण्याची शक्यता; पगार ३४ टक्क्यांनी वाढणार

Tadgola Benefits : ताडगोळे फळ कधी खाल्ले आहे का? चमत्कारी फायदे वाचाल तर आताच खरेदी कराल

Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT