Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Accident : शाळेच्या बसमधून खाली पडताच चाकाखाली आला; विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, घरी परतताना घडली घटना

Solapur News : मुलांना शाळेत ये- जा करण्यासाठी पालक वर्ग खासगी रिक्षा किंवा शालेय प्रशासनाची बस लावतात. मुलांना बसमधून नेताना आणि घरी आणत असताना त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी चालक व सोबत असलेल्या वाहकाची असते

विश्वभूषण लिमये

सोलापूर : शाळेत ये- जा करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी शाळेची बस असून शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी जात असताना धावत्या बसमधून विद्यार्थी खाली कोसळला. यानंतर डोक्यावरून बसचे चाक गेल्याचा त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. मुलाच्या मृत्यूने पालकांनी आक्रोश केला. तसेच शाळा प्रशासनाच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

सोलापूरमध्ये घडलेल्या या घटनेत अनुराग तीपण्णा राठोड (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. मुलांना शाळेत ये- जा करण्यासाठी पालक वर्ग खासगी रिक्षा किंवा शालेय प्रशासनाची बस लावत असतात. अर्थात मुलांना बसमधून नेताना आणि घरी आणत असताना त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी बस चालक व सोबत असलेल्या वाहकाची असते. मात्र यात निष्काळजीपणा केल्याने मुलाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. 

धावत्या बसमधून पडला 
अनुराग राठोड हा शाळा प्रशासनाच्या बसमधूनच तो ये- जा करत होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत गेला होता. दुपारी शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी येतं असताना बसमधून तो खाली पडला. त्यानंतर बसच्या चाकाखाली सापडला. डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने अनुरागचा जागीच मृत्यू झाला होता. तर अचानक घडलेल्या या घटनेने बसमधील अन्य विद्यार्थी घाबरले होते. 

कुटुंबीयांचा आक्रोश 
दरम्यान अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. तर बसमध्ये विद्यार्थी असताना बसचा दरवाजा बंद करणे गरजेचे होते. मात्र गाडीतील वाहकाने काळजी घेतली नसल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप अनुरागच्या कुटुंबीयांनी केला. तर याप्रकरणी बस चालक, वाहक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

Famous Singer Death : संगीत क्षेत्रातला अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

महागड्या क्रिम्स कशाला? चेहऱ्याचे काळे डाग आणि खाज घालवण्यासाठी कापूर ठरेल वरदान; पाहा वापरण्याची योग्य पद्धत!

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

SCROLL FOR NEXT