NRI Couple Admit Son In ZP School saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad School: परदेशी जोडप्यानं सांगलीच्या ZP शाळेत लेकाला केलं दाखल, कारण काय तर...

NRI Couple Admit Son In ZP School: विदर्भ वगळता राज्यभरात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली. सोमवार 16 जूनपासून शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी 'शाळा प्रवेशोत्सवा'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आलं.

Bharat Jadhav

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना प्रवेश देण्यास बहुतेक पालक इच्छुक नसतात. आपल्या मुलाला इंग्रजीचं ज्ञान अवगत व्हावे यासाठी अनेकजण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. पण कोल्हापुरात एक कमालीची गोष्ट घडलीय. येथील एका एनआरआय जोडप्यानं आपल्या मुलाला चक्क मराठी शाळेत घातलंय. अभियंता जोडप्याच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

अमेरिकेतील एका भारतीय सॉफ्टवेअर अभियंता दाम्पत्याने त्यांच्या ७ वर्षांच्या मुलाला सांगली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केलंय. मुलाला मराठी शिकता, यावे मराठी भाषेचं ज्ञान मिळावं, यासाठी त्यांनी त्याला झेडपी शाळेत दाखल केलंय. विहान असं या मुलाचं नाव आहे. उत्तर कॅरोलिनामध्ये शिक्षण घेत असताना विहानला मातृभाषा विसरावी लागली असती, त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला सांगलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केलं.

जिल्हा परिषदेतील शिक्षण दर्जेदार असते, त्यामुळे विहानच्या पालकांनी त्याला झेडपी शाळेत घातलं. विहान सांगलीतील आपल्या काका आणि चुलत भावांसोबत राहणार आहे. विहानचे पालक अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी विहानला मातृभाषा शिकता यावी यासाठी त्याला सांगलीमधील आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं.

विहान त्याच्या काकांसोबत राहील आणि त्याच्या चुलत भावांसोबत शाळेत जाईल. विहानच्या आईचे नाव भारती विजयकुमार शेलके आहे. भारती यांच्या पतीचे नाव विजय कुमार आहे. ते १५ वर्षांपासून अमेरिकेत अभियंता म्हणून काम करत आहेत. ते २०१६ मध्ये लग्नानंतर अमेरिकेत राहण्यासाठी गेले. विजय कुमार आणि भारती यांना दोन मुलं आहेत.

विहान ७ वर्षाचा आहे तर दुसऱ्या मुलगा फक्त २ वर्षांचा आहे. भारती शेलके यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, विहान उत्तर कॅरोलिना येथील एका शाळेत शिकत होता. तेथे प्रामुख्याने इंग्रजी भाषिक रहिवासी राहतात.

तेथील शिक्षण हे इंग्रजीतून घ्यावे लागत होते. तेथील शाळेत प्रवेश घेतल्यानंतर विहान सुरुवातीला मराठी भाषेचे काही शब्द बोलू शकत होता. पण काही दिवसानंतर विहानला बोलताना मराठी शब्द सुचत नव्हते. तो मातृभाषा विसरु लागला होता. त्यामुळे विहानने मराठी शिकावे, असं आम्हाला वाटत होतं. दर्जेदार शिक्षण हवे असेल तर झेडपीची मराठी शाळा हा पर्याय चांगला असेल, असं आम्हाला वाटलं, असं विहानची आई भारती शेलके म्हणाल्या.

विजयकुमार यांच्याकडे अमेरिकेचा L1 व्हिसा आहे. तर भारती यांच्याकडे L2 व्हिसा आहे, जो L1 व्हिसा धारकाच्या पती/पत्नी आणि अविवाहित मुलांना (२१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या) अमेरिकेत राहण्याची परवानगी देणारा असतो. व्हिसा संपण्यास अजून दीड वर्ष बाकी आहे. पण आपण भारतात परतण्याचा निर्णय घेऊ शकतो," भारती शेलके म्हणाल्या .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

SCROLL FOR NEXT