Nanded ZP Saam Tv
महाराष्ट्र

Nanded: झेडपीच्या अभियंत्याला कार्यालयात डांबलं, वजिराबाद पोलिसात गुन्हा

कडी उघडण्यासाठी येत असलेल्या सेवकालाही धमकावण्यात आल्याचं कळतंय.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड: जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओमप्रकाश निला यांना एका कार्यकर्त्याने कार्यालयात डांबून ठेवल्याची घटना घडलीये. या प्रकरणात रात्री उशिरा कार्यकर्त्यांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Social Worker locked executive engineer of Nanded zila parishad case filed).

जिल्हा परिषदेच्या (Zila Parishad) दक्षिण उपविभागात उप अभियंता असलेल्या शिवाजी वारकड यांना पदभार का देत नाहीत, म्हणून मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ता मारोती बिचेवार यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात येऊन ओमप्रकाश निला यांच्याशी हुज्जत घातली. 'तुला नोकरी करायची असेल, तर 50 हजार रुपये द्या' अशी मागणी ही केली आणि कक्षा बाहेर येऊन कक्षाची कडी लावली.

कडी उघडण्यासाठी येत असलेल्या सेवकालाही धमकावण्यात आल्याचं कळतंय. या प्रकरणी कार्यकारी अभियंता ओमप्रकाश निला यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मारोती बिचेवार विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेतकऱ्यांसाठी मोठी मदत, देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Breaking News: शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, २५३ तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Nashik Corporation : नाशिक महापालिकेसाठी ९ वर्ष जुन्या प्रभाग रचनेलाच मंजुरी; निवडणूक ठरणार चुरशीची, कोणत्या पक्षाला होणार फायदा?

Rohit sharma: आयतं कर्णधारपद कोणालाही मिळू नये! कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माचा जुना Video होतोय व्हायरल

Political News : ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

SCROLL FOR NEXT