Raju Shetty
Raju Shetty Saam Tv
महाराष्ट्र

मंत्र्यांवर झालेल्या आरोग्य खर्चाचे सामाजिक ऑडिट करावे; राजू शेट्टींची मागणी...

भारत नागणे

पंढरपूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या 17 मंत्र्यांवर कोरोना‌ (Corona) काळात करण्यात आलेला १ कोटी ४० लाख रूपयांचा आरोग्य खर्च आता वादात सापडला आहे. कोरोना काळात अनेक गरीब रूग्ण उपचारा अभावी तडफडून मरत असताना सर्व सामान्यांच्या पैशावर हे राजकीय बांडगुळं का पोसायची असा सवाल उपस्थित करत या संशयास्पद खर्चाचे सरकारने ऑडिट करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे.

हे देखील पाहा -

शेट्टी यांनी राज्य सरकारच्या विरोधात बळीराजा हुंकार यात्रा काढली आहे. ही यात्रा रात्री माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे मुक्कामी आली होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी ‌यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिकास्त्र सोडले.

एका बाजूला कोरोना काळात उपचार करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून अनेक गरीब रूग्ण तडफडून मेले तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर एवढा अमाप खर्च झाला. ही बांडगुळ सर्वसामान्य लोकांनी का पोसायची? हा खरा सवाल आहे. खरोखरच एवढे पैसे खर्च व्हावेत इतका त्यांचा गंभीर आजार होता का ? याचे देखील सोशल ऑडिट झाले पाहिजे. सरकारमध्ये हिंमत असेल तर मंत्र्यांच्या आरोग्यावर करण्यात आलेल्या आरोग्य खर्चाचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून हे सोशल ऑडिट करावे अशी मागणी ही शेट्टी यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT