अमरावतीत राजकीय वातावरण तापलं; राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेना सज्ज

राणा दाम्पत्य आज रात्री ७ वाजता अमरावती रेल्वे स्टेशन वरून आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईसाठी निघणार आहे.
Amravati News Updates, Amravati Political News updates, Ravi Rana Latest news updates, Navneet Rana News Updates
Amravati News Updates, Amravati Political News updates, Ravi Rana Latest news updates, Navneet Rana News UpdatesSaam Tv

अमर घटारे

अमरावती - जिल्ह्यासह राज्यात हनुमान चालीसा वरून राजकीय वातावरण चागलेच तापले असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana)यांनी मुंबई (Mumbai) येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरला आहे. राणा दाम्पत्य आज रात्री ७ वाजता अमरावती रेल्वे स्टेशन वरून आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईसाठी निघणार आहे. (Amravati Political News Updates)

हे देखील पाहा-

तर दुसरीकडे याला उत्तर देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिक देखील सज्ज झाले आहते. कोणत्याही परिस्थितीत राणा दाम्पत्याला अमरावती वरूनच निघू देणार नाही यासाठी शिवसैनिकांनी तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करून आज सायंकाळी बडनेरा रेल्वे स्थानकावर उपस्थित रहा अस आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर राणा समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com