रेशनच्या दुकानांमध्ये गहू, तांदळासोबत मिळणार साबण, शाम्पू, चहा-पावडर; सरकारचा अध्यादेश SaamTV
महाराष्ट्र

रेशनच्या दुकानांमध्ये गहू, तांदळासोबत मिळणार साबण, शाम्पू, चहा-पावडर; सरकारचा अध्यादेश

राज्य शासनाने स्वस्तभाव धान्य दुकानदारांना सरकारी किमतींमध्ये धान्य आणि साखरे बरोबरच साबण, शाम्पू, चहा-पावडर आणि कॉफी या वस्तू विकण्याची परवानगी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : राज्यात जवळपास सात कोटी ग्राहक आजही रेशन दुकानातून धान्याची खरेदी करतात. रेशन दुकानांमध्ये (Ration Shop) आतापर्यंत फक्त गहू, तांदूळाबरोबर साखर मिळत होती. मात्र आता रेशन दुकानात आणखी काही वस्तूची भर पडणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा चांगलाच फायदा होणार आहे. राज्य शासनाने स्वस्तभाव धान्य दुकानदारांना सरकारी किमतींमध्ये धान्य आणि साखरे बरोबरच साबण, शाम्पू, चहा-पावडर आणि कॉफी (Soap, Shampoo, Tea-powder and Coffee) या वस्तू विकण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या वस्तू बाजारभावाप्रमाणे नागरिकांना मिळणार आहेत. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

राज्यात 51 हजार 500 दुकानांमधून 7 कोटी ग्राहक धान्याची खरेदी करतात. सध्या रेशनच्या दुकानांमध्ये गहु, तांदूळ आणि साखर या वस्तू व्यतीरिक्त बाजारातील अन्य वस्तू विकण्यास मनाई होती. या वस्तू विकण्याची परवानगी देण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. खुल्या बाजारातील साबण, हँन्डवॉश, डिटर्जंट या बरोबरच शाम्पू, चहापावडर, कॉफी या वस्तू विकण्यास मान्यता देण्यात आली असली तरी ही परवानगी अस्थायी स्वरूपात आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरूपात वेळोवेळी होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने बदल करण्यात येणार आहे. या वस्तूंचे वितरण आणि विक्री व्यवहार संबंधित कंपनी आणि विक्री हा व्यवहार संबंधित कंपनी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामध्ये राहणार आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांना उत्पन्न वाढीचे नवनवीन स्रोत उपलब्ध व्हावे आणि नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निर्णय सरकारने घेतल्याचे रेशन दुकानदार सांगताय तर दुसरी कडे रेशन दुकानदारांना मिळणारे कमिशन परवडणारे नाही, ते दिल्ली आणि तामिळनाडू प्रमाणे मिळावे अशी मागणी राज्यातील दुकानदारांची आहे. मात्र कमिशन वाढवून न मिळाल्याने त्याला पर्याय म्हणून असा आदेश काढण्यात आला आहे. आमच्याकडून अशा वस्तू ग्राहक घेणार नाहीत असा आरोप आता विक्रेते करीत आहेत. कमिशन वाढवून द्यावे आणि मोफत धान्य वितरणातील मूळ रक्कम आणि कमिशन अदा करावे यासाठी एक डिसेंबरपासून राशन दुकानदार संप करणार असल्याची माहिती आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT