Supriya Sule News Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule Speech:...तर मला वर्ध्यातून निवडणूक लढायला आवडेल; सुप्रिया सुळेंनी सांगितली मनातली इच्छा

Supriya Sule latest Speech in Wardha: 'कधी तरी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लढायला आवडेल. मी पक्षालाही अनेकदा सांगितलं आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली.

Vishal Gangurde

Supriya Sule Latest News:

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच मोठं वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळेंनी या निवडणुकीआधीच मनातील राजकीय इच्छा बोलून दाखवली आहे. 'कधी तरी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लढायला आवडेल. मी पक्षालाही अनेकदा सांगितलं आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. (Latest Marathi News)

सुप्रिया सुळे आज रविवारी वर्ध्याच्या दौऱ्यावर होत्या. वर्ध्यात सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यावर मोठं भाष्य केलं.

सुप्रिया सुळेंनी सांगितलं वर्ध्याचं नातं

'माझं वर्धा जिल्ह्याशी भावनिक नातं आहे. माी कर्मभूमी बारामतीच असणार, पण वर्ध्याच्या मातीशी माझं मला नातं शब्दात सांगता येणार नाही. ते माझ्या मनात आहे. वर्षातून दोनदा माझी कार वर्ध्याला जातेच, असंही सुळे यांनी सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक घटना आनंद देणारी, तर दुसरी...: सुप्रिया सुळे

'आज भारतात दोन महत्वाच्या घटना घडल्या आहेत. एका घटना आनंद देणारी आहे, तर दुसरी दु:ख देणारी आहे. एकीकडे संविधान दिवस आणि दिवस २६/11 चा हल्ला आहे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला खूप काही दिलं. आपण त्यांना छोट्या चौकटीत अडकवतो. मी देशाबाहेर गेल्यावर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विचारलं जातं. आपल्या कृतीतून त्यांचा विचाराचा प्रसार केला पाहिजे, असंही त्या पुढे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर रामदास तडस यांची प्रतिक्रिया

'कदाचित सुप्रिया सुळे यांना वाटत असेल की, बारामतीतून मी निवडून येऊ शकत नाही म्हणून वर्धेतून लढावं. पण वर्धा लोकसभा मतदारसंघ बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारत नाही. वर्धेतून बाहेरचा उमेदवार लढल्यास मोठ्या मताधिक्याने पराभूत होतो, या शब्दात भाजप खासदार रामदास तडस यांनी सुप्रिया सुळे यांच्या वर्धेतून निवडणूक लढण्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe: मुंबई स्टाईल चमचमीत पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने नंदुरबारमध्ये शेतकरी संतप्त

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला, तरीही हप्ता आला नाही, लाडकीला ₹१५०० कधी मिळणार?

Gold- Silver Price: सोन्याला पुन्हा चकाकी! १० तोळे १२००० रुपयांनी महागले; २४-२२ कॅरेटचे आजचे दर किती?

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साईबाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी शिर्डीकरांकडून मदतीचा हात

SCROLL FOR NEXT