महाड शहरातून आतापर्यंत उचलला तब्बल 6 हजार 700 मेट्रिक टन कचरा  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

महाड शहरातून आतापर्यंत उचलला तब्बल 6 हजार 700 मेट्रिक टन कचरा

मंगळवार पर्यंत अजून 3 हजार मेट्रिक टन कचरा उचलला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - 22 जुलै रोजी आलेल्या पुराने महाड शहर हे चिखलमय झाले. पूर ओसरल्यानंतर शहराच्या स्वच्छतेची मोहीम जिल्हा प्रशासन, स्थानिक महाड नगरपरिषद, इतर महानगर पालिका यांच्या मार्फत हाती घेतली. आतापर्यंत शहरातील 6 हजार 700 मेट्रिक टन कचरा उचलला असून त्याचे विघटन करण्यात आले आहे. मंगळवार पर्यंत अजून 3 हजार मेट्रिक टन कचरा उचलला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. महाड शहर स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाने सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून पावले उचलली गेली आहेत. (So far 6,700 metric tons of garbage has been cleared from Mahad city)

हे देखील पहा -

अतिवृष्टीने महाडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडून शहरासह तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. दरवर्षी पेक्षा यावेळी शहरात पुराची स्थिती ही नाजूक होती. पूर ओसरल्यानंतर बाजरपेठेत, दुकानात, घरात चिखलच पसरला होता. पहिल्यांदाच यावर्षी पूर आल्यानंतर शहरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे चिखल आणि कचरा साफ करण्याचे मोठे आव्हान शासन आणि प्रशासनासमोर उभे राहिले होते.

जिल्हा प्रशासनासोबत, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पुणे महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, अधिकारी हे आठ दिवसांपासून महाड शहर स्वच्छ करण्यासाठी झटत आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षातर्फे मशिनरी, सामाजिक संस्थांचे सदस्य हे सुद्धा शहरातील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आहेत. सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत शहरातील 6 हजार 700 मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT