Video Viral  Saam TV
महाराष्ट्र

Video Viral : गोणीत भरताना कोब्रा उलट फिरला अन् दंश केला; सर्प मित्राचा जागीच मृत्यू , VIDEO

Snake Bite Video : कोबरा सापाचा दंश झाल्यावर सर्प मित्राला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Ruchika Jadhav

गोंदियाच्या फुलचुर येथील शेकडो सापांना जीवनदान देणाऱ्या एका सर्प मित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. अत्यंत विषारी असलेल्या कोब्रा साप चावल्याने या व्यक्तीला मृत्यूने कवटाळलं आहे. कोबरा सापाचा दंश झाल्यावर सर्प मित्राला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुनील नागपुरे (वय ४४) असं सर्प मित्राचं नाव आहे. काल रात्री गोंदियाच्या कारंजा येथे एका घरी साप निघाल्याची माहिती त्यांना मिळाली. सापाला रेस्क्यू करण्यासाठी त्यांनी लगेचच या ठिकाणी धाव घेतली. जवळ असलेली स्नेक स्टिक घेऊन ते तेथे पोहचले. येथे पोहचल्यावर घरातील आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व व्यक्ती एका ठिकाणी जमा झाल्या होत्या.

त्यानंतर त्यांनी आपल्या स्नेक स्टिकने सापाला कपडलं. त्यांनी पकडलेला साप अत्यंत विषारी किंग कोब्रा होता. त्यामुळे त्याला रेस्क्यू करताना सुनील यांनी पूर्ण काळजी घेतली होती. त्यांनी कोब्रा पकडला आणि जवळ असलेल्या गोणीमध्ये भरला. साप गोणीत जात असताना तो अचानक उलट फिरला आणि त्याने लगेचच सुनील यांना दंश केला.

सापाने त्यांना दंश केल्याचं तेथे उपस्थित अन्य सर्व व्यक्तींनी पाहिलं होतं. मात्र दंश केल्यानंतर देखील सुनील लगेचच मागे हटले नाहीत. त्यांनी सापाला आपल्या हातांनी पकडलं आणि पुन्हा गोणीमध्ये ठेवलं. साप पुन्हा गोणीत भरत असताना चक्कर येऊन त्यांचा तोल जात होता.

गोणी बांधल्यानंतर सुनील यांना तात्काळ गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. सापांना जीवदान देणाऱ्यालाच सापाने दंश केला त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनील यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबियांनी रडून आक्रोश व्यक्त केला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता सुनील यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी शिवाजी पार्कात चाहत्यांची गर्दी

तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

SCROLL FOR NEXT