Snake found in Scooty viral News Saam TV
महाराष्ट्र

अरे बापरे! धावत्या स्कुटीच्या हेडलाइटमधून अचानक निघाला विषारी साप अन्...

धावत्या स्कुटीमधून अचानक साप निघाल्याची घटना समोर आली आहे. वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी.

विनोद जिरे

बीड: पावसाळ्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनो जरा ही बातमी वाचा. धडकी भरवणारा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. शेतातून दूध आणण्यासाठी अभिषेक लाखे हा तरुण शेतकरी स्कुटीवर जाताना घरापासून काही अंतरावर गेल्यावर अचानक हेडलाइटमधून एक साप बाहेर आला.

परंतु न घाबरता अभिषेक लाखे या तरुणाने स्कुटी थांबवली आणि सापाला बाहेर काढले. हा घोणस जातीचा कवड्या विषारी साप असल्याचे सांगितले जात असून, मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. बीडच्या (Beed) केज तालुक्यातील आडस या गावात हा प्रकार घडला आहे. (Snake found in Scooty at Adas village in Kej Taluka Beed viral News)

सध्या पावसाळ्याचे (Rain) दिवस असून, पाऊस पडल्याने जमिनीतील छिद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे साप बाहेर निघत आहेत. ते जागा मिळेल तिथे आसरा घेत आहेत. आडस येथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पुरुषोत्तम तागड यांची स्कुटी रात्री त्यांच्या घराबाहेर उभी होती. तागड यांच्याकडे काम करत असलेला अभिषेक लाखे हा स्कुटीवरून दूध आणण्यासाठी शेतात निघाला होता. (Viral News)

रस्त्यातच स्कुटीच्या हेडलाइटमधून एक साप (Snake) बाहेर आलेला दिसला. साप पाहताच सुरुवातीला घाबरले. परंतु प्रसंगावधान राखून स्कुटी थांबवली. जवळच असलेल्या वॉशिंग सेंटरवरील काहींना मदतीसाठी हाक दिली. त्यांनी येऊन त्या सापाला बाहेर काढले. घोणस जातीचा हा साप असल्याचे सांगण्यात येत आहे. दुचाकीस्वार घाबरले असते तर, स्कुटी पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दुचाकीस्वारांनी सकाळी दुचाकी बाहेर काढताना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच; बुलढाणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

'त्या' विधानाने अमरावतीत राजकीय भुकंप! यशोमती ठाकूर बावनकुळेंवर संतापल्या; पाहा काय घडलं?

राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

Cancer symptoms in women: रात्री उशिरा जेवण टाळा! झोप, पचन आणि वजनावर होऊ शकतो परिणाम

भाजप अन् आम आदमी पक्षाची 'या' ठिकाणी युती; राजकारणातली सर्वात मोठी बातमी

SCROLL FOR NEXT