Smart meter | Electricity bill hike : राज्यात स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव बिलांचा जोरदार 'शॉक' बसत आहे. त्याविरोधात सामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पालघरमध्ये वीज बिल दुप्पट-तिप्पट आल्यानं नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे, या सक्तीला सर्वसामान्यांसह सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेनेही विरोध केलाय. महावितरणच्या हुकूमशाही कारभाराविरोधात राजकीय पक्षांनी विविध ठिकाणी मोर्चे काढून आंदोलनंही सुरू केलीत.
अचानक वीज बिल दुप्पट-तिप्पट आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे, महावितरणच्या या सक्तीच्या कारभाराला केवळ विरोधकांनीच नव्हे, तर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनीही जोरदार विरोध दर्शवला आहे स्मार्ट मीटर बसवल्यापासून नेहमीपेक्षा दुप्पट ते तिप्पट वीज बिल येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
ग्राहकांची कोणतीही परवानगी न घेता किंवा त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देताच महावितरणकडून मीटर बदलण्यात आले आहेत. मीटर बसवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना सक्तीचे अल्टिमेटम दिले जात आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण आहे.
कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पालघर या परिसरामध्ये स्मार्ट मीटरविरोधात सर्वात जास्त तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. महावितरणच्या या 'हुकूमशाही' कारभाराविरोधात महाविकास आघाडी (मविआ) आणि सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी मोर्चे काढून आंदोलने सुरू केली आहेत. वाढीव बिलांच्या त्रासातून सामान्य जनतेला त्वरित दिलासा न मिळाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.