संतापजनक! तथाकथित मौलाने केला चिमुकलीचा विनयभंग जयेश गावंडे
महाराष्ट्र

संतापजनक! तथाकथित मौलाने केला चिमुकलीचा विनयभंग

या घृणास्पद घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - सात वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे. या घृणास्पद घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोडकेवाडी परिसरातील रहिवासी मोहम्मद रिजवान अब्दुल शकुर 26 याने त्याच भागातील 7 वर्षीय चिमुकलीला थांबून शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता तिला जवळ घेतले.

हे देखील पहा -

'तू कुठल्या मदरशात शिक्षण घेते', असे विचारणा करून तिच्या अंगाला स्पर्श करून हात धरून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीने आरडाओरडा केल्यानंतर तिची आई, वडील आणि काकांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोहम्मद रिजवान अब्दुल शकुर याच्याविरुद्ध भादवि कलम 354 तसेच पास्को एक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

तसेच न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बजाविले. ही कारवाई ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष म्हणजे, मोहम्मद रिजवान अब्दुल शकुर हा तथाकथित मौलाना असल्याचे पोलिसांनी सांगितले असून तो एका साप्ताहिकाचा पत्रकार असल्याचे ही पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी कायम

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

शेतकरी कर्जमाफीनंतर राज्य सरकारनं पशुपालक, कुक्कुटपालकांसाठी घेतला मोठा निर्णय,बळीराजाला आले 'अच्छे दिन'

SCROLL FOR NEXT