Chandrapur Accident News Saam Tv
महाराष्ट्र

टँकर - ट्रकच्या अपघातात ९ ठार; मृतदेह पाहताच पाेलीस गहिवरले, नवी दहेलीवर शाेककळा

या अपघातात ट्रकचे टायर फुटल्याने आग भडकली.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे झालेल्या भीषण अपघातात (accident) नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास अजयपूर गावाजवळ दाेन ट्रकची (truck) समाेरासमाेर धडक झाली हाेती. दरम्यान मृतात अमरावती, वर्धा, नवी दहेली तसेच काेठारी येथील रहिवाशांचा समावेश आहे असे पोलीसांनी (police) सांगितले. (chandrapur latest marathi news)

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी : अजयपूर गावाजवळ दाेन ट्रक समाेरासमाेर धडकले. या अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली. संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली. तसेच आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. मूल-चंद्रपूर (chandrapur) येथून अग्निशमन पथके घटनास्थळी पाेहचली. त्यांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच मूल-रामनगर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी तसेच महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये हा अपघात झाला. या अपघातानंतर भीषण आग लागली हाेती. या आगीमुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी लाकूड भरलेल्या ट्रकमधील मृतदेहांचा काेळसा झाल्याचे विदारक दृश्य पाेलीसांच्या नजरेस पडले हे सांगताना त्यांचे डाेळे भरुन आले हाेते.

दरम्यान प्लास्टिक पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात (chandrapur general hospital) नेण्यात आले. पेट्राेल टँकरचा चालक हाफीज खान (अमरावती) आणि वाहक संजय पाटील (वर्धा) यांचा मृतात समावेश आहे. लाकूड भरलेल्या ट्रकमधील सात जणांचा मृत्यू झालेला आहे. या ट्रकमधील सात जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अशी

हाफीज खान (अमरावती)

संजय पाटील (वर्धा)

अजय डोंगरे (बल्लारपूर)

प्रशांत नगराळे (लावारी, नवी दहेली)

मंगेश टिपले (लावारी, नवी दहेली)

भैय्यालाल परचाके (लावारी, नवी दहेली)

बाळकृष्ण तेलंग (लावारी, नवी दहेली)

साईनाथ कोडाप (लावारी, नवी दहेली)

संदीप आत्राम (कोठारी)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसाचा पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे जाणून घ्या

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

तुम्ही रेल्वे वाले, आम्ही लाथ मारून जागा दाखवू; होमगार्डनं धावत्या लोकलमध्येच गार्डच्या मारली लाथ, VIDEO व्हायरल

Avoid Using Kokum: कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाकू नये?

MLC Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा डाव; पाठिंब्यासाठी ठाकरेंसमोर ठेवली एक अट

SCROLL FOR NEXT