Ahmednagar accident  Saam Tv
महाराष्ट्र

अहमदनगर-दौंड रस्त्यावरील भीषण अपघातात सख्ख्या बहिण- भावाचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर: अहमदनगर- दौंड रस्त्यावर (Ahmednagar Daund Highway) एका भीषण अपघातामध्ये बहिण आणि भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. ही घटना काल घडली आहे. महिंद्रा पिकअप आणि स्कूटीच्या अपघातामध्ये सख्या भावा- बहिणीचा मृत्यू झाला आहे. काष्टी दौंड रस्त्यावर मोटार सायकलला पिकअपने (Pickup) धडक दिल्याने अनुष्का गणेश शिंदे (वय-14) आणि आदित्य गणेश शिंदे (वय-12) हे भाऊ बहिण जागीच ठार झाले आहेत. ही घटना काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

अनुष्का आणि आदित्य हे मूळचे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खुलू या गावचे (village) रहिवासी होते. अनुष्का आणि आदित्य हे सकाळी स्कुटीवरून काष्टी कडून दौंडच्या दिशेने शाळेत निघाले होते. अनुष्का स्कुटी चालवत होती. परंतु, समोरून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने जोरात धडक दिली त्यातच दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील सोनवडी येथील धनश्री हॉटेल (Hotel) जवळच घडली आहे. धडक दिल्यावर गाडी चालक पळून गेला आहे. या अपघातामध्ये (accident) भावा- बहिणीचा मृत्यू झाला आहे, तर स्कुटीचे नुकसान झाले आहे.

ज्या पिकअपने धडक दिली ती गाडी पासिंग झाली नव्हती. अनुष्का आणि आदित्यचे चुलते सतिश शिंदे यांनी अज्ञात वाहन धारकाविरोधामध्ये दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सतीश शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT